Country's tallest tricolor unfolds in Belgaum
बेळगावात फडकला देशातील सर्वात उंच तिरंगा By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 08:40 PM2018-03-13T20:40:49+5:302018-03-13T20:40:49+5:30Join usJoin usNext बेळगाव : देशातील सर्वात उंच ठरणारा तिरंगा ध्वज सोमवारी (दि.12) बेळगावात फडकला. सुमारे 110 मीटर उंच असलेल्या या राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा किल्ला आवारात पार पडला. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देऊन आपला आनंद व्यक्त केला. संपूर्ण देशातच उंच असा राष्ट्रध्वज बेळगावात फडकवण्यात आल्याने बेळगाववासीयांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी बटन दाबून ध्वजारोहण केले. 3.5 एचपी विद्युत मोटारीच्या साहाय्याने सावकाशपणे हा ध्वज 110 मिटर उंच असणाऱया ध्वजस्तंभावर चढविण्यात आला. ध्वजारोहण झाल्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीच्या (बँड पथक) जवानानी देशभक्तीपर गीतांची धून सादर केली. यावेळी राष्ट्रगीत सादर करण्यात आले.टॅग्स :राष्ट्रध्वजकर्नाटकNational FlagKarnatak