covid causing pneumonia will death rate increase in india
कोरोनानं आता होतोय निमोनिया, मृत्यूदर वाढण्याचा धोका; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा इशारा! वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:47 PM2023-04-05T13:47:10+5:302023-04-05T13:56:45+5:30Join usJoin usNext तीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असूनही कोरोना व्हायरस काही गेलेला नाही. कोरोनाचा प्रभाव आता कमी झालाय असं जेव्हा जेव्हा वाटू लागतं तेव्हा रुग्णांच्या संख्येत वाढ होते. आता आठ महिन्यांनंतर देशात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २३ हजाराहून अधिक झाली आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ नोंदवली जात आहे. तसंच पॉझिटिव्हीटी रेट देखील वाढला आहे. विशेषत: दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना विषाणू धोकादायक ठरत आहे. देशातील या तीन राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढत आहे. तर काही रुग्णांमध्ये निमोनियाचीही तक्रार नोंदवली जात आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार निमोनिया हा एक फुफ्फुसांशी निगडीत आजार असून त्यावर उपचार न केल्यास जीवघेणा देखील ठरू शकतो. रुग्णांना होतोय बॅक्टेरियन निमोनिया एम्समध्ये क्रिटिकल केयर डिपार्टमेंटचे प्रोफेसर डॉ.युद्धवीर सिंह म्हणाले की, कोरोनाची लक्षणं कमी दिसून येत असली तरी काही रुग्णांमध्ये बॅक्टरियल निमोनियाची तक्रार आढळून आली आहे. आता कोविडमुळे रुग्णांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढत आहे. वयस्क आणि इतर आजारांनी त्रस्त रुग्ण देखील रुग्णालयात दाखल होत आहे. दरम्यान ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं किंवा फु्फ्फुसांमधील इन्फेक्शनचे रुग्ण अद्याप आढळून आलेले नाहीत. पण ज्यापद्धतीनं कोरोना रुग्ण वाढत आहे ते पाहता सतर्क होणं गरजेचं आहे. विषाणू म्यूटेड होत असून सातत्यानं नवे व्हेरिअंट तयार होत आहेत. हे व्हेरिअंट वेगानं पसरत आहेत. त्यामुळे कोरोनाबाबतीत निष्काळजीपणा बाळगणं खूप महागात पडू शकतं.मृत्यूदर वाढू शकतो? कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. पण यामुले मृत्यूदर वाढण्याचा धोका सध्यातरी नाही. आतापर्यंत कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्याचे रुग्ण नाहीत. त्यामुळे मृत्यूदर वाढण्याचा धोका सध्या कमी आहे. पण ज्यांना आधीपासूनच कॅन्सर, एचआयव्ही, टीबी किंवा किडनी आणि लिवरशी निगडीत समस्या आहेत. अशा रुग्णांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. नवी लाट येण्याचा धोका किती? महामारी तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर म्हणाले की रुग्णांची संख्या वाढत असली तरी यात सध्या तरी इतकी वाढ नाही की ज्यावरुन कोरोनाची लाट येण्याचं कारण ठरू शकेलं. सध्या नव्या ओमायक्रॉन एक्सबी.१.१६ व्हेरिअंटमुळे रुग्णसंख्या वाढली आहे. हा व्हेरिअंट रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असलेल्यांना लक्ष्य करतो. व्हायरसचा प्रसार एखा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत सहजपणे होत आहे. यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. पण रुग्णवाढीचा वेग सध्यातरी इतका नाही की ज्यानं कोरोनाची लाट येऊ शकेल. कसा बचाव कराल? डॉ जुगल किशोर यांच्या मते, सर्व लोकांना मास्क वापरणे पुन्हा सुरू करावे लागेल. मास्क विषाणूपासून संरक्षण करेल. विशेषतः ऑफिसमध्ये किंवा बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. जर तुम्हाला दमा, ब्राँकायटिस किंवा सीओपीडी असेल तर मास्क हे एकमेव संरक्षण आहे. याशिवाय वृद्धांनीही याचा वापर करावा. कारण यावेळी विषाणूचा प्रसार वाढत आहे. अशा परिस्थितीत तो उच्च जोखमीच्या लोकांना लक्ष्य करू शकतो. टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याCorona vaccinecorona virus