CoronaVirus : भारतीयांची चिंताच मिटली! Omicron पासून असा बचाव करणार कोविशील्ड; नव्या अभ्यासात मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 10:33 PM 2021-12-11T22:33:12+5:30 2021-12-11T22:50:14+5:30
मॅरी म्हणाल्या, आशा आहे, की कोरोनाच्या गंभीर लक्षणांविरोधात लस चांगला परिणाम देईल. त्यामुळे आपन अद्याप लस घेतलेली नसेल, तर ती लवकरात लवकर टोचून घ्या... कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटने संपूर्ण जगातच दहशत निर्माण केली आहे. भारतातही या व्हेरिअंटचे रुग्ण आढळू लागले आहेत. चिंतेची गोष्ठ म्हणजे, हा व्हेरिअंट लसीकरण झालेल्या लोकांनाही संक्रमित करत आहे. लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तिसऱ्या बूस्टर डोसवरही जबरदस्त चर्चा सुरू आहे.
दरम्यान, यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA)ने शुक्रवारी सांगितले की, कोविड-19 लसीचा तिसरा बूस्टर डोस ओमाक्रॉन व्हेरिअंटच्या सिम्प्टोमॅटिक इंफेक्शनपासून 70 ते 75 टक्के संरक्षण करू शकतो.
हेल्थ एजन्सीने म्हटले आहे, की भारतात कोविशील्ड म्हणून वापरल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेनेका आणि फायझर/बायोअॅन्डटेक लसींचे दोन्ही डोस, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटच्या तुलनेत ओमाक्रॉनपासून कमी संरक्षण देतात. मात्र, व्हॅक्सीनचा तिसरा बूस्टर डोस नव्या व्हेरिअंटविरोधात इम्यूनिटी बूस्ट करतो. हा दावा 581 ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांच्या विश्लेषणावर आधारलेला आहे.
UKHSA ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्यस्थितीत कुठलाही बदल न झाल्यास ब्रिटेनमध्ये सक्रमित रुग्णांची संख्या या महीन्याच्या अखेरपर्यंत 10 लाखांच्याही पुढे जाईल. सुरुवातीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, की बूस्टर डोस नव्या व्हेरिअंटविरोधात 70-75 टक्के प्रभावी आहे.
महत्वाचे म्हणजे, हे आकडे अगदी लेटेस्ट आहेत. यामुळे अंदाजात बदलही होऊ शकतो. एक्सपर्ट्सनी म्हटले आहे की, लस कोरोनाच्या धोक्यापासून अजूनही चांगल्या प्रकारे बचाव करू शकते.
UKHSA येथे हेड ऑफ इम्यूनायझेशनच्या प्रमुख डॉ. मॅरी रामसे म्हणाल्या, 'सुरुवातीच्या अंदाजानुसार, सावधपणे पुढे जायला हवे. संकेत आहेत, की दुसऱ्या डोसच्या काही दिवसांनंतर, ओमायक्रॉनने संक्रमित होण्याचा धोका डेल्टा व्हेरिअंटच्या तुलनेत अधिक असतो.
मॅरी म्हणाल्या, आशा आहे, की कोरोनाच्या गंभीर लक्षणांविरोधात लस चांगला परिणाम देईल. त्यामुळे आपन अद्याप लस घेतलेली नसेल, तर ती लवकरात लवकर टोचून घ्या.
डॉ. मॅरी म्हणाल्या, शक्य असल्यास लोकांना वर्क फ्रॉम होमवरच ठेवायला हवे. मास्क न लावता घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. हात नियमितपणे धुवायला हवेत. तसेच, आजाराचे कुठलेही लक्षण दिसत असल्यास, तत्काळ तपासणी करावी आणि स्वतःला आयसोलेट करावे.