Cyclone Bulbul 2 killed, normal life disrupted in West Bengal
Cyclone Bulbul : पश्चिम बंगालमध्ये 'बुलबुल' चक्रीवादळाचा कहर, प्रचंड नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 02:55 PM2019-11-10T14:55:34+5:302019-11-10T15:02:51+5:30Join usJoin usNext बुलबुल चक्रीवादळ ओडिशाच्या किनारीपट्टीवर धडकले असून वादळच्या तडाख्याने किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळामुळे झाडे, वीजेचे खांब कोसळले असून त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले तसेच वीजपुरवठा खंडित झाला आहे. वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून मदतकार्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कोसळलेली झाडे रस्त्यातून बाजूला सारण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व ओडिशा आपत्ती निवारण धडक कृती दलाने हाती घेतले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य नियंत्रण कक्षात जाऊन स्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. बुलबुल वादळामुळे केंद्रपारा जिल्ह्यातील राजनगर भागात शुक्रवारपासून 180 मिमी तर चांदबाली भागात 150 मिमी व जगतसिंगपूर जिल्ह्यातील त्रितोल येथे 100 मिमी पाऊस पडला आहे. बुलबुल वादळाची तीव्रता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून कोलकाता विमानतळ 12 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किनारपट्टी भागातील 1 लाख 20 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. किनारपट्टी भागातील 1 लाख 20 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. टॅग्स :बुलबुल चक्रीवादळचक्रीवादळपश्चिम बंगालओदिशापाऊसCyclone Bulbulcyclonewest bengalOdishaRain