Cyclone Fani makes landfall in Puri, photos viral
ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं फनी चक्रीवादळ, फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 12:09 PM2019-05-03T12:09:34+5:302019-05-03T12:17:38+5:30Join usJoin usNext बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. या चक्रीवादळामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. या चक्रीवादळामुळे भुवनेश्वरमधल्या अनेक ठिकाणी झाडं कोसळली. फनी चक्रीवादळासाठी आपत्ती निवारण विभागाची 34 पथकं सज्ज झाली आहेत. 175 किलोमीटर प्रति तासानं हे फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलंय. आंध्र प्रदेशातील नागरिकांना लागलीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या चक्रीवादळामुळे श्रीकाकुलम भागात 20 घरं कोसळली आहेत. टॅग्स :फनी वादळFani Cyclone