पुढच्या महिन्यात पोरीचं लग्न, देवाखातर उघड्यावर आणू नका; ...म्हणून वडिलांना दहशतवाद्यांपुढे जोडावे लागले हात By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:32 PM 2020-06-22T22:32:50+5:30 2020-06-22T22:43:31+5:30
पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न होणार आहे. आमच्यावर दया करा देवासाठी बाहेर या. मी हे घर खूप मेहनतीने बांधले आहे. ते उद्ध्वस्त करू नका. माझ्या आयुष्याची सर्व जमापुंजी खर्च करून हे घर बांधले आहे. अशी हृदय पिळवटून टाकणारी विनवणी एका मुलीच्या आई - वडिलांनी केली. परंतु असहाय्य आई - वडिलांना हे माहित नव्हते की, ते ज्यांच्याकडे माणुसकीची भीक मागत होते, ते प्रत्यक्षात ते मानवतेचेच शत्रू आहेत. रविवारी श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. दहशतवादी ज्या घरात लपले होते ते घर स्थानिक नागरिकाचे आहे.
पुढच्या महिन्यात त्यांच्या मुलीचे लग्न होते. हे समजताच दहशतवादी त्यांच्या घरात लपून बसले आणि चकमकी सुरु केल्या. त्यावेळी हतबल पिता चकमकीच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती.
या घरमालकाने दहशतवाद्यांना घराबाहेर जाण्याची विनंती केली. परंतु दहशतवाद्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. त्याचवेळी या तिन्ही दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने शरण येण्याची संधीही दिली होती. पण ते त्यांनी मान्य केले नाही. परिणामी तिन्ही दहशतवादी ठार झाले.
दरम्यान, सुरक्षा दलाने अशा प्रकारे कारवाई केली की, त्यांच्या घराचे नुकसान कमीत कमी होईल. त्यामुळे ऑपरेशन संपल्यानंतर या जोडप्याने सुरक्षा दलाचे आभार मानले.
जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजी (काश्मीर झोन) विजय कुमार म्हणाले की, या कारवाईत सुरक्षा दलाला आणि आजूबाजूच्या भागाचे कोणतेही नुकसान झाले नाही.
तसेच परिसरातील जनतेचे देखील कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. त्यासाठी मी सैनिकांचे आभार मानतो. (All Photo - Amar Ujala)