Droupadi Murmu: द्रौपदी मुर्मूंनी आठवण करून दिली! १८५७ पूर्वीही ब्रिटिशांविरोधात एक मोठी क्रांती झालेली; 30 हजार संथालींनी हौतात्म्य पत्करलेले By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:38 AM 2022-07-26T10:38:32+5:30 2022-07-26T10:46:21+5:30
santhal british rebellion in 1855: ३० जूनला हूल क्रांती दिवस पाळला जातो. किती जणांना माहिती आहे... १८५७ आधी काय घडलेले... त्या पराक्रमी समाजातून येतात आपल्या राष्ट्रपती... द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यानंतर पहिले भाषण दिले. यावेळी त्यांनी संथाली समाजाने इंग्रजांविरोधातील लढा आणि ३० हजार लोकांचे हौतात्म्य याचा उल्लेख केला. खरेतर १८५७ च्या उठावाच्या आधी ही इंग्रजांविरोधात झालेली पहिली क्रांती होती. त्यापूर्वीही अनेक समाजांनी इंग्रजांविरोधात उठाव केला होता.
संथाल आंदोलनाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. देशभरात ३० जूनला हूल क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो. परंतू तो फारसा कोणाला माहिती नाही. हा दिवस याच आदिवासी समाजांनी इंग्रजांविरोधात गाजविलेल्या शौर्यगाथा आणि बलिदानासाठी साजरा केला जातो.
३० जून १८५५ चा दिवस. तेव्हा इंग्रजांच्या जाचक धोरणांमुळे प्रत्येक भारतीय आक्रोश करत होता पण तो काही करू शकला नाही. इंग्रजांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढत होते. संथाल जमातीच्या लोकांना हे हाल पहावत नव्हते. पण बंडाचा बिगुल वाजला तर कोण फुंकणार? हा प्रश्न होता.
एकदा उठाव केला, तेव्हा इंग्रजांनी तो चिरडून टाकला, संथाल समाज झारखंडच्या पर्वतीय भागात गेला, तिथली जमीन शेतीयोग्य बनविली. इंग्रजांचीही नजर दमनीकोहावर पडली. पोहोचले आणि भाडे व कर वसूल करण्याची धमकी देऊ लागले. आता त्या भागात जमीनदार, सावकार, सावकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वर्चस्व वाढू लागले.
कराची रक्कम इतकी ठेवली गेली की ते दबले. कर्जावर 50 ते 500 टक्के व्याज आकारू लागले. यामुळे त्यांच्या जमिनींवर इंग्रज आणि सावकारांनी कब्जा केला. संथाल समाज पिचला गेला होता. यावेळी त्यांना सिद्धू नावाच्या क्रांतीकाऱ्याने रस्ता दाखविला.
जनतेच्या पाठिंब्याशिवाय क्रांती होऊ शकत नाही. संथाल समाजाचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसावा म्हणून सिद्धूने स्वतःची ओळख देवदूत म्हणून करून दिली. भगवान ठाकूर यांनी पाठवल्याचे सिद्धूंनी सांगितले. यानंतर ३० जूनला बैठक बोलावली ज्यामध्ये 10,000 संथाल सहभागी झाले.
ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला आणि 400 गावांतील 50,000 हून अधिक लोकांनी यात सहभाग घेतला. आमची माती सोडण्याची घोषणा केली. आदिवासींनी पारंपरिक शस्त्रांच्या सहाय्याने या बंडात भाग घेतला. यामुळे इंग्रज बिथरले आणि हा लढा मोडून काढण्यासाठी तयारी सुरु केली.
पहिले स्वातंत्र्ययुद्ध 1857 मध्ये झाल्याचे मानले जाते. परंतू, झारखंडच्या आदिवासींनी 1855 मध्येच ब्रिटीशांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला होता. सिद्धू आणि कान्हू यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या साहिबगंज जिल्ह्यातील भागनाडीह गावातून बंडाची सुरुवात झाली.
इंग्रजांनी १८५६ मध्ये रातोरात मार्टिलो टॉवर बांधला. त्याला लहान लहान छिद्रे होती. त्यामागे लपून संथालांना बंदुकींनी लक्ष्य करता येईल, अशी त्यांची योजना होती. तरीही संथाल लढले.
सिद्धू आणि कान्हू या दोघांनाही पकडण्यात आले आणि 26 जुलै 1855 रोजी झाडाला लटकवून फाशी देण्यात आली. या शहिदांच्या स्मरणार्थ दरवर्षी संपूर्ण देश 'हुल क्रांती दिवस' साजरा करतो.