In the death sentence of late Prime Minister Jawaharlal Nehru, there is a glimpse of patriotism
दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या मृत्युपत्रात आहे देशप्रेमाची झलक By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 09:18 PM2019-05-27T21:18:29+5:302019-05-27T21:21:59+5:30Join usJoin usNext देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची 55 वी पुण्यतिथी आहे. जवाहरलाल नेहरु यांच्या जीवनाबद्दल काही गोष्टी अशा आहेत ज्या लोकांना माहीत नाही. त्यांच्या मृत्युपत्राबाबत काय लिहिलंय हे खूप कमी लोकांना माहीत आहे. जवाहरलाल नेहरु यांचा जन्म काश्मीरी पंडिताच्या घरी 14 नोव्हेंबर 1889 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरु होतं. जवाहरलाल नेहरु यांनी महात्मा गांधीच्या साथीने काँग्रेसमध्ये काम केलं. 1929 मध्ये जवाहरलाल नेहरु यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. 1941 मध्ये महात्मा गांधींचे उत्तराधिकारी म्हणून जवाहरलाल नेहरु यांची घोषणा झाली. नेहरुंच्या फॅशनची अनेकदा चर्चा झाली. नेहरुंचा बंद कॉलरवाला जॅकेट आजपण लोक पसंत करतात. पंडीत नेहरु हे एक चांगले नेते, वक्ते यासोबत लेखकदेखील होते. नेहरुंनी लिहिलेली पुस्तके नक्कीच वाचायला हवीत. नेहरुंनी लिहिलेल्या अनेक पत्रांमधून आणि पुस्तकांमधून त्यांना भारताबद्दल किती प्रेम होतं हे दिसून येतं. नेमकं हेच त्यांच्या मृत्युपत्रात झळकून आलं. नेहरुंनी मृत्युपत्रात लिहिलंय की, माझी इच्छा अशी आहे, माझी राख प्रयागच्या संगमावर वाहणाऱ्या नदीमध्ये सोडावी. त्यामुळे हिंदूस्तानाच्या प्रत्येक कोपऱ्याशी हात जोडून मी समुद्रात मिसळेल. माझ्या राखेतील जास्तीत जास्त भाग विमानातून खाली दिसणाऱ्या शेतांमध्ये पसरवावी. त्यामुळे माझं असणं देशातील प्रत्येक मातीत सामावून जाईल. टॅग्स :जवाहरलाल नेहरूJawaharlal Nehru