दिल्लीतील भारतपार्क 'या' महिन्यापासून सुरु, समावेश असेल 'या' ऐतिहासिक स्थळांच्या प्रतिकृतींचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 04:23 PM2021-09-23T16:23:13+5:302021-09-23T17:32:15+5:30

भारतीय संस्कृती आणि देशाचा दैदीप्यमान इतिहास सांगणाऱ्या २१ स्मारकांची प्रतिकृती असलेलं भारत दर्शन पार्क दिल्लीमध्ये ऑक्टोबरमध्ये खुल होणार आहे. वेस्ट टु वंडर पार्कच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या या पार्कमध्ये कोणकोणत्या ऐतिहासिक स्थळांच्या प्रतिकृती असतील हे जाणून घेऊया. तसेच ते कधीपासून खुल होणार आहे तेही जाणून घेऊया.

तयार होत असलेल्या या पार्कमध्ये मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाची अशी प्रतिकृती असेल.

या पार्कमध्ये बद्रीनाथ, रामेश्वरम, जगन्नाथ पुरी आणि द्वारका येथील चार धाम मंदिरांच्या प्रतिकृती देखील असणार आहे.

हैदराबादेतील प्रसिद्ध चारमिनारचीदेखील प्रतिकृती पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल. ८.५ एकरमध्ये पसरलेले हे 'भारत दर्शन पार्क' पार्क दिल्ली महानगरपालिकेने विकसित केले आहे.

महाराष्ट्रातील अजिंठा आणि एलोरा लेण्यांचीही प्रतिकृती असणारे हे पार्क १४ कोटी खर्च करून विकसित करण्यात येत आहे.

भारत दर्शन पार्कमध्ये कर्नाटकातील प्रसिद्ध गोल घुमटचीही प्रतिकृती असेल. त्यामुळे पर्यटकांना या पार्कची उत्सुकता लागली आहे.

या सर्व प्रतिकृती रॉड आणि वाहनांच्या स्टीलच्या रिम्ससारख्या लोखंडापासून बनवल्या जातील.

या उद्यानात राजस्थानच्या जुनागढ किल्ल्याच्या प्रतिकृतींचा समावेश असेल. ज्यामुळे पर्यटकांना राजस्थानच्या संस्कृतीचीही माहिती होईल.

मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिराची प्रतिकृतीही 'भारत दर्शन पार्क' मध्ये उद्यानात पहायला मिळेल.

कोणार्क मंदिराची प्रतिकृती पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

म्हैसूर पॅलेस पार्कमधील प्रतिकृतींपैकी एक असेल. रंगीबेरंगी दिव्यांच्या साहाय्याने प्रतिकृती चमकवल्या जाणार आहेत.

या पार्कमध्ये हंपी आणि नालंदाच्या अवशेषांची प्रतिकृतीही असेल. वॉकिंग ट्रॅकचे बांधकाम आणि वृक्षारोपणाचे काम सोडल्यास बहुतेक मोठे बांधकाम काम पूर्ण झाले आहे.

'भारत दर्शन पार्क' मध्ये सांचीच्या स्तुपाची प्रतिकृतीही बसवली जाईल. उद्यानात 110 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा यंत्र ही बसवले जाणार आहेत.