दिल्लीत भाजपा नेत्यावर बूट फेकणारा तो होता सुशिक्षित डॉक्टर, हल्ल्यामागे होतं नोटाबंदी कारण? By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:01 PM 2019-04-19T18:01:43+5:30 2019-04-19T18:05:21+5:30
दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रवक्ते जीवीएल नरसिम्हा यांची पत्रकार परिषद सुरु असताना एका माणसाने त्यांच्यावर अंगावर बुट फेकून मारला. त्यांचे नाव आहे. डॉ. शक्ती भार्गव. शक्ती भार्गव यांच्या आई डॉ. दया भार्गव यांच्याकडे जुन्या नोटा ठेवल्याच्या प्रकरणातून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आयकर विभागाने टाकलेल्या धाडीमध्ये डॉ. शक्ती यांच्या घरातून 1 लाख 44 हजार रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. या प्रकरणामध्ये आयकर विभागाकडून डॉ.शक्ती भार्गव आणि डॉ. दया भार्गव यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रिझर्वं बँक अधिनियम 5 ए 7 अंतर्गत गुन्हा दाखल झाला
दिल्लीमध्ये भाजपा प्रवक्त्यावर बूट फेकण्याचं प्रकरण घडल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली त्यानंतर ही गोष्ट समोर आली. आयकर विभागाने मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात भार्गव यांच्या घरी धाड टाकली होती. त्यानंतर 31 मार्च रोजी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आशिष शुक्ला यांनी सांगितले की, आयकर विभागाने डॉ. शक्ती भार्गव यांच्या मातोश्री दया भार्गव यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला. त्यात दया यांच्यावरील आरोप खरे ठरले. ज्याआधारे 31 मार्च रोजी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
डॉ. शक्ती भार्गव दिल्लीतील पार्वती बागला रोडवरील शिवरतन अपार्टमेंटमध्ये राहतात. डॉ. शक्ती भार्गव यांचा एक मुलगा परदेशात शिक्षण घेतोय. डॉ. शक्ती यांच्या मातोश्री डॉ. दया भार्गव सिव्हील लाईन्समधील भार्गव हॉस्पिटलजवळील त्यांचा दुसरा मुलगा संजीव यांच्यासोबत राहतात.