Delhi Violence: बंदुकधारी तरुण भाजपा समर्थक नाहीच, जाणून घ्या सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:20 AM 2020-02-25T11:20:17+5:30 2020-02-25T11:30:40+5:30
सीएएविरोधातील आंदोलनातून दिल्लीत हिंसाचार पेटला आहे. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये परिस्थिी नियंत्रणाबाहेर गेली असून राजकीय व जातीय चष्म्यातून या आंदोलनाकडे पाहिले जात आहे. लोकांना तुम्ही हिंदू आहे की मुस्लीम? असा प्रश्न विचारण्यास सुरुवात झाली आहे. धार्मिक आधारावर मारहाण, हिंसाचार पेटवला जात आहे. असाच धक्कादायक प्रकार दिल्लीतील हिंसाचारादरम्यान घडला. दिल्लीतील उत्तरपूर्व भागातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनातील एक तरुण चक्क पोलिसावर गोळी चालविण्याची भाषा करताना दिसत आहे.
पोलिसा जवानाच्या अंगावर धावून गेलेल्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो सीएएच्या विरोधात प्रदर्शन करणाऱ्या जमावातील आहे.
मौजपूर भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलेले असताना बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, तो भाजपा समर्थक नसल्याचे उघड झाले आहे.
या तरुणाच्या पाठीमागील जवामाने भगवा रंग्यांचा झेंडा हातात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. पण, तो भगव्या रंगाच झेंडा नसून ते प्लॅस्टीक कॅरेट्स आहेत.
पोलिसावर बंदुक रोखून धरणारा हा तरुण भाजपाचा कार्यकर्ता असून तो सीएएच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याचं मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, सत्य वेगळंच आहे.
बंदुकीधारी तरुणाच्या पाठिमागील जमाव हा सीएए विरोधातील असल्याचे व्हिडीओ चित्रित करणारे पत्रकार सौरभ त्रिवेदी यांनी म्हटले आहे. कारण, हा जमाव जाफराबाद मेट्रो स्टेशनच्या दिशेने आला होता.
जमावातील हातात भगव्या रंगाचा झेंडा असून ते भाजपाचे समर्थक असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्री ही खोटी माहिती पसरविण्यात आली होती.
दिल्ली पोलिसांनी या बंदुकधारी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याचं नाव शाहरुख आहे. तो संबंधित परिसरातील स्थानिक रहिवासी आहे
दिल्लीतील मौजपूर नहर रोडवरील सेठ भगवानदास स्कूलसमोर दंगेखोरांनी दुकानांना आग लावली. गाद्यांच्या दुकानांना आग लावल्यावर हा दंगेखोर जमाव जाफराबादच्या दिशेने घोंडाचौककडे निघाला.
दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेले प्रयत्न दिसत आहेत. त्याचदरम्यान, एका दंगेखोराने थेट पोलिसावर पिस्तूल रोखले. मात्र एवढ्या तणावाच्या परिस्थितीतही संबंधित पोलीस कॉन्स्टेबल एक पाऊलही मागे हटला नाही.
दिल्लीतील हिंसाचारात रतन लाल या पोलीस हवालदारासह पाच नागरिकांचा मृत्यू झाला. हिंसाचारात पोलीस उपायुक्तासह अनेक पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले.
व्हिडीओ पत्रकार सौरभ त्रिवेदी यांनी या बंदुकधारी दंगेखोराच व्हिडीओ चित्रित केला असून तो एन्टी सीएए म्हणजे सीएए कायद्याला विरोध करणारा असल्याचे त्यांनी सांगितलंय.