ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अवघ्या एका धावेने पराभव झाला. यासोबतच पहिल्यांदा आयपीएल जिंकण्याचं पुण्याचं स्वप्न भंगलं. पराभवामुळे पुण्याचे चाहते चांगलेच निराश झाले पण यावेळी आयपीएलच्या सुरूवातीला आणि अंतिम सामन्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीवर टीका करणा-या पुण्याच्या मालक बंधूंवर चाहत्यांनी निशाणा साधला. हर्ष गोयंका आणि संजीव गोयंकावर चाहत्यांनी तोंडसुख घेतलं. आयपीएलच्या सुरूवातीला पुण्याच्या मुंबईवरील पहिल्या विजयानंतर हर्ष गोयंका यांनी धोनीच्या चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता. मॅच विनिंग खेळी करणा-या स्मिथचं त्यांनी कौतूक केलं होतं. यावेळी त्यांनी, "स्मिथने दाखवून दिलं कोण आहे जंगलचा राजा, आपल्या कामगिरीने त्याने धोनीला पूर्णतः झाकोळलं, स्मिथची कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय योग्यच होता" असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतरही धोनीच्या चाहत्यांनी गोयंका यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. वाढती टीका पाहून गोयंका यांनी ते ट्विट नंतर डिलीट केलं. त्यानंतर सुरूवातीच्या काही सामन्यानंतर हर्ष गोयंका यांनी पुन्हा धोनीविरोधी ट्विट केले होते. त्यांनी धोनीवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. पंजाबविरूद्ध झालेल्या पराभवानंतर त्यांनी आपल्या संघातील खेळाडूंच्या स्ट्राइक रेटचा फोटो ट्विट केला. यामध्ये अप्रत्यक्षपणे संघात धोनीचा सर्वात खराब स्ट्राइक रेट असल्याचं त्यांनी म्हटलं. ट्विटमध्ये जरी त्यांनी धोनीचं नाव घेतलं नसलं तरी हे ट्विट धोनीसाठीच होतं हे धोनीच्या चाहत्यांनी हेरलं आणि गोयंका यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला. आतापर्यंत मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे आणि डॅनियल ख्रिस्टियन यांचा सर्वात जास्त स्ट्राइक रेट असल्याचं त्यांनी ट्वीट केलं. त्यासोबत त्यांनी आकडेवारीचा एक फोटो अपलोड केला. त्यामध्ये धोनी पाचव्या नंबरवर होता आणि केवळ 73 इतका त्याचा स्ट्राइक रेट होता. त्यानंतर आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी संजिव गोयंका यांनी हिंदुस्थान टाइम्ससोबत बोलताना स्टिव्ह स्मिथ हा महेंद्रसिंग धोनीच्या एक पाऊल पुढचा विचार करतो असं म्हटलं होतं. त्यामुळे चाहते चांगलेच नाराज होते, अखेर पुण्याच्या पराभवानंतर चाहत्यांनी पुण्याच्या मालकांवर टीकेची झोड उठवली. ट्विटरवर गोयंका बंधू झाले ट्रोल- Dear Steve Smith,If You Take The Game Till Last Over, You Must Know How To Finish It Off. #IPL #MSDhoni #RPSvsMI #RPSvMI #MIvRPS #Dhoni pic.twitter.com/MaZDFiflLW— Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) May 21, 2017Let"s Have 2 Minutes Of Silence For Goenka"s King Of Jungle: Steve Smith"s Innings. #IPL #MSDhoni #RPSvsMI #RPSvMI #MIvRPS #Dhoni pic.twitter.com/qVPNEGc077— Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) May 21, 2017