सिंगापूरमध्ये धावतेय 'दिवाळी स्पेशल ट्रेन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2017 20:00 IST2017-10-20T19:56:16+5:302017-10-20T20:00:20+5:30

अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळी साजरी केल्यानंतर आता सिंगापूरमध्ये दिवाळीच्या थीमवर काही ट्रेन्स चालवण्यात आल्या.

सिंगापूरच्या वाहतूक मंत्रालयाचा भाग असलेल्या लँड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीने दिवाळीच्या थीमवर आधारीत ट्रेन्सची अंतर्गत सजावट केली होती.

फक्त ट्रेन्स नव्हे तर, संपूर्ण रेल्वे स्टेशन आणि पाच बसेसची दिवाळीच्या थीमवर सजावट करण्यात आली होती.

प्रकाशाचा उत्सव दिवाळीची आम्ही सुरुवात करत आहोत. लोकांना ट्रेन, स्टेशन्सवर भारतामध्ये असल्याचा फिल येईल असे लँड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीने सांगितले.

टॅग्स :दिवाळीdiwali