ब्यूटी विद ब्रेन! डॉक्टरने पहिल्याच प्रयत्नात पास केली UPSC, झाली IPS; १ मिलियन फॉलोअर्स By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 11:51 AM 2024-07-01T11:51:12+5:30 2024-07-01T11:58:34+5:30
Navjot Simi : डॉक्टर असलेल्या नवजोत सिमी IPS अधिकारी बनल्या आहेत. प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. डॉक्टर असलेल्या नवजोत सिमी IPS अधिकारी बनल्या आहेत.
२१ डिसेंबर १९८७ रोजी पंजाबच्या गुरदासपूरमध्ये नवजोत यांचा जन्म झाला. त्यांनी बाबा जसवंत सिंह डेंटल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, लुधियाना येथून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) ची डिग्री प्राप्त केली.
नवजोत यांनी डेंटिस्ट म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी काही काळ काम केलं.
दिल्लीतील एका संस्थेतून कोचिंग घेतलं आणि पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा ७३५ रँकने उत्तीर्ण केली.
आयपीएस सेवा आणि बिहार केडर देण्यात आलं. सध्या नवजोत सिमी या बिहारमध्ये एसपी (वीकर सेक्शन अँड वुमन सेल) पदावर कार्यरत आहेत.
आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारीला आळा घातला. महिला आणि मुलांची सुरक्षा आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.
एका मुलाखतीत, त्यांनी परीक्षेतील यशासाठी मुख्य घटक म्हणून डेडिकेशन आणि मोटिवेशन यांच महत्त्व अधोरेखित केलं आहे.
सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सामील होण्यासाठी एक क्लिअर व्हिजन आणि कारण असणं आवश्यक आहे आणि त्यातून त्यांना काय साध्य करायचं आहे ते साध्य करता येतं असं म्हटलं आहे.
नवजोत सिमी या इन्स्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियावर देखील खूप एक्टिव्ह आहेत आणि इन्स्टाग्रामवर त्याचे तब्बल १.१ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.