Donald Trump's India Visit : फक्त ट्रम्प, जिनपिंग, शिंजो आबेच नाही; PM मोदींनी 15 राष्ट्रप्रमुखांना दाखवलं 'आपनु गुजरात' By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 05:00 PM 2020-02-24T17:00:54+5:30 2020-02-24T17:29:32+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात अहमदाबाद येथे आगमन झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात अहमदाबाद येथे आगमन झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत.
बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. फक्त ट्रम्प, जिनपिंग, शिंजो आबेच नाहीत तर पंतप्रधान मोदींनी 15 राष्ट्रप्रमुखांना गुजरात दाखवलं आहे.
शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे अहमदाबादमध्ये आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष होते. 17 ते 19 सप्टेंबर 2014 रोजी शी जिनपिंग आणि पंतपधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती.
डोनल्ड रबींद्रनाथ रामोतार गुयानाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनल्ड रबींद्रनाथ रामोतार यांनी 7 ते 12 जानेवारी 2015 रोजी अहमदाबादला भेट दिली.
शेरिंग तोबगे भूतानचे तत्कालीन पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी 10 ते18 जानेवारी 2015 रोजी अहमदाबादला भेट दिली.
फिलिप जेसिंटो न्यूसी मोझाम्बिकचे राष्ट्राध्यक्ष फिलिप जेसिंटो न्यूसी 4 ते 8 ऑगस्ट 2015 रोजी अहमदाबाद दौऱ्यावर आले होते.
शिंजो आबे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 11 ते 13 डिसेंबर 2015 रोजी अहमदाबादला भेट दिली होती.
केपी शर्मा ओली नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी 19 ते 24 फेब्रुवारी 2016 रोजी अहमदाबादमध्ये आले होते.
अँटोनियो कोस्टा पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी 7 ते 13 जानेवारी 2017 रोजी अहमदाबाद दौरा केला होता.
अॅलेक्झांडर वुकिक सर्बियाचे पंतप्रधान अॅलेक्झांडर वुकिक हे 9 ते 12 जानेवारी 2017 रोजी गुजरातमध्ये आले होते.
विद्या देवी भंडारी नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्या देवी भंडारी यांनी 17 ते 21 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती.
शिंजो आबे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे 13 ते 14 सप्टेंबर 2017 दुसऱ्यांदा अहमदाबाद दौऱ्यावर आले होते.
बेंजामिन नेतान्याहू इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी 14 ते 19 जानेवारी 2018 रोजी अहमदाबादमध्ये आले होते.
जस्टिन ट्रूडो कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आपल्या कुटुंबियांसह 17 ते 24 फेब्रुवारी 2018 मध्ये अहमदाबादमध्ये आले होते.
इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी 9 ते 12 मार्च 2018 रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती.
डॉ. फ्रँक वाल्टर स्टाइनमायर जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष डॉ. फ्रँक वाल्टर स्टाइनमायर हे 22 ते 25 मार्च 2018 मध्ये अहमदाबादमध्ये आले होते.
डॅनी एंटोइन रोलेन सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॅनी एंटोइन रोलेन 22 ते 27 जून 2018 रोजी अहमदाबादमध्ये आले होते.
प्रविंद कुमार जगन्नाथ मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी 20 ते 28 जानेवारी 2019 मध्ये पंतपधान मोदींची भेट घेतली.
महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे 7 ते 11 फेब्रुवारी 2020 रोजी अहमदाबादमध्ये आले होते.