Donald Trump's India Visit : मेलानिया ट्रम्प दिल्लीतील 'हॅप्पीनेस क्लास'ला भेट देतात तेव्हा... By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 05:04 PM 2020-02-25T17:04:27+5:30 2020-02-25T17:25:24+5:30
Donald Trump's India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतील शाळेचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी 'हॅप्पीनेस क्लास'ला भेट दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प राजधानी दिल्लीत आहेत. ट्रम्प यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या देखील आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतील शाळेचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी 'हॅप्पीनेस क्लास'ला भेट दिली.
मेलानिया ट्रम्प दिल्लीतील मोतीबाग येथील सर्वोदय विद्यालयात दाखल झाल्या. शाळेत दाखल होताच विद्यार्थ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
दिल्ली सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील 'हॅप्पीनेस क्लास'ला देखील मेलानिया यांनी भेट दिली.
मेलानिया ट्रम्प यांचे विद्यार्थिनींनी औक्षण करून स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मेलानिया शाळेला भेट देणार असल्याने शाळेची सुंदर सजावट करण्यात आली होती.
वर्गातील फळ्यावर मेलानिया यांच्या स्वागताचा संदेश लिहिण्यात आला होता.
मेलानिया यांनी शाळेला भेट देण्यापूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून दिल्लीकरांचे अभिनंदन केले.
अमेरिकेच्या प्रथम महिला दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देत आहेत याचा आनंद आहे. आमच्या शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि दिल्लीकरांसाठी आजचा दिवस खास आहे.
अनेक वर्षांपासून भारत जगाला आध्यात्मिकता शिकवत आहे. आमच्या शाळेतून मेलानिया काही तरी संदेश घेऊन जातील, असा विश्वास केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केला
दिल्लीतील सरकारी शाळेत मागील दीड वर्षापासून हॅप्पीनेस क्लास घेण्यात येत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विशेष ज्ञान देण्यात येते. त्यामुळे याचे नाव हॅप्पीनेस क्लास ठेवण्यात आले आहे.