एका क्षणात क्षेपणास्त्र खाली पाडणार...शत्रू नेहमी नजरेसमोर असणार..., स्वदेशी MALE ड्रोन तपसने केले 18 तास उड्डाण! By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 01:23 PM 2022-12-08T13:23:37+5:30 2022-12-08T14:27:32+5:30
Tapas : तपस म्हणजे उष्णता. हा संस्कृत शब्द आहे. तपस हे पाळत ठेवण्यास तसेच हल्ला करण्यास सक्षम आहे. तपसचे (Tapas) पूर्ण नाव टॅक्टिकल एअरबॉर्न प्लॅटफॉर्म फॉर एरिअल सर्व्हिलांस बेयॉन्ड होराइझन (Tactical Airborne Platform for Aerial Surveillance-Beyond Horizon)आहे. तपस म्हणजे उष्णता. हा संस्कृत शब्द आहे. तपस हे पाळत ठेवण्यास तसेच हल्ला करण्यास सक्षम आहे.
तपस एक मेल (MALE) ड्रोन आहे. म्हणजे मीडियम अल्टिट्यूड लाँग एन्ड्युरन्स ड्रोन. हे डीआरडीओचीच (DRDO) शाखा असलेल्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंटने बनवले आहे. 2016 पासून त्याचे उत्पादन सुरू आहे. त्याची टेस्ट फ्लाइट अनेक वेळा झाली आहे. लवकरच तपसचा तिन्ही सैन्यात समावेश केला जाईल.
तिन्ही सैन्याने मिळून 76 तपस ड्रोनची मागणी केली आहे. यापैकी 60 भारतीय लष्करात जाणार आहेत. 12 भारतीय वायुसेना आणि 4 ड्रोन भारतीय नौदलाला पाठवण्यात येणार आहेत. हे जनरल अॅटॉमिक्स ऑफ अमेरिकेच्या MQ-1 प्रीडेटर ड्रोनसारखे आहे. अमेरिकन लोकांनी प्रीडेटर ड्रोनचे पाळत ठेवण्यापासून फायटरमध्ये रूपांतर केले. हे ड्रोन हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करू शकते.
तपस ड्रोन स्वतःहून टेक ऑफ आणि लँड करू शकतो. हे रिअल-टाइम, उच्च-रिझोल्यूशन इंटेलिजन्स, सव्हिलांस अँड रिकॉन्सेंस, SAR, EO सारखी कामे करू शकते. जर टारगेट निश्चित केले असेल तर ते लेझर बीम टाकून ते प्रकाशित करू शकते, त्यानंतर लेझर मार्गदर्शित क्षेपणास्त्रे किंवा लढाऊ विमानांनी हल्ला केला जाऊ शकतो.
कमी उंचीवर उड्डाण केल्यास ते हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रानेही हल्ला करू शकते. हे 350 किलो वजनाच्या पेलोडसह उड्डाण करू शकते. 31.2 फूट लांबीच्या या ड्रोनचा पंख 67.7 फूट आहे. यात तीन ब्लेडेड प्रोपेलर आहेत, जे त्याला उडण्याची ताकद देतात.
तपस ड्रोन ताशी 224 किलोमीटर वेगाने 1000 किलोमीटरपर्यंत सतत उड्डाण करू शकते. यात 24 तास सतत उडण्याची क्षमता आहे. कमाल 35 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकते. पुढच्या वर्षाच्या अखेरीस हे ड्रोन तिन्ही भारतीय लष्करासाठी उपलब्ध होतील, असा विश्वास आहे.
तपस ड्रोन मिळाल्यानंतर तिन्ही लष्करांना अमेरिकन आणि इस्रायली ड्रोन खरेदी करावे लागणार नाहीत. हेरगिरी, पाळत ठेवणे आणि हल्ला करणे हे आपल्या ड्रोनद्वारेच केले जाऊ शकते.