Droupadi Murmu: राष्ट्रपतींचे खरे नाव द्रौपदी नाही, शिवभक्त पण देव्हाऱ्यात शंकर नाही; जाणून घ्या यामागची 'रहस्ये'... By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:27 PM 2022-07-25T22:27:30+5:30 2022-07-26T13:14:25+5:30
Droupadi Murmu Real Name Story: देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातही भगवान शंकर असेल... पण... देशाच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. जेव्हा त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तेव्हा त्यांचा एक झाडू मारतानाचा फोटो व्हायरल झाला होता. परंतू, आता द्रौपदी मुर्मू यांचे खरे नाव द्रौपदी नाहीय. त्या शिवभक्त आहेत पण त्यांच्या देव्हाऱ्यात शंकराची ना मूर्ती आहे ना फोटो. काय आहेत या मागची रहस्ये...
2013 मध्ये मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर द्रौपदी मुर्मू या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. यावर मात करण्यासाठी त्यांनी अध्यात्माचा रस्ता धरला व शिवभक्त बनल्या. मांसाहारही सोडला, आता त्या लसूण, कांदाही खात नाहीत.
द्रौपदी यांच्या वहिणी शाक्य मुनी सांगते, 'त्या शाकाहारी आहेत. सकाळी नाश्त्यासाठी घरी जे काही तयार केले जाते ते खातात. काही ड्रायफ्रूट्स त्याच्या नाश्त्यात असतात. दुपारी भात, भाजी, रोटी खातात. रात्री थोडे फळ आणि हळद दूध घेतात.'
शिवभक्त असलेल्या द्रौपदी यांच्या देव्हाऱ्यात मात्र शंकर नाही. एका गुरुचा फोटो आहे. लक्ष्मी नारायण आणि भगवान विष्णूंचा फोटो आहे. त्याच्या वरती श्रीकृष्णाचा फोटो आहे. पण शंकराची मूर्ती, फोटो काहीच नाही.
यावर शाक्य़मुनी म्हणतात, द्रौपदींचा शिव शंकर निराकार आहे. दिसत नसला तरी त्या मंद प्रकाशात शंकराचे ध्यान करतात. मी देखील तसेच ध्यान करते. राष्ट्रपती भवनातही भगवान शंकर असेल, पण तो दिसणारा नाही तर निरंकारी. शंकराच्या धान्यासाठी त्या मंद लाईट आणि एक पुस्तक सोबत ठेवतात.
त्याहून आश्चर्यकारक बाब म्हणजे द्रौपदी मुर्मू यांचे खरे नाव द्रौपदी नव्हते. ना लग्नानंतर बदलले. द्रौपदींचे नाव 59 वर्षांपूर्वी बदलण्यात आले. कोणी बदलले? ते आदिवासी नाव होते, महाभारतातील द्रौपदी हे नाव त्यांना कोणी दिले? याचेही रहस्य समोर आले आहे.
द्रौपदी मुर्मू यांचे खरे नाव पुत्ती होते. जेव्हा त्यांचे शाळेसाठी नोंदणी करण्यात आली तेव्हा त्यांच्या पहिलीच्या शिक्षकांनी हे नाव बदलून द्रौपदी ठेवले. घरच्यांनी पुत्ती हे नाव ठेवलेले. त्यांना वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत पुत्ती या नावानेच ओळखले, हाक मारली जायची. मदन मोहन महंतो या शिक्षकांनी त्यांचे नाव बदलले, असे द्रौपदी यांच्या शाळेत दोन वर्षे सिनिअर असलेल्या जोगिंदर कुमार यांनी सांगितले.
'द्रौपदी जितकी वाचन आणि लेखनात चांगली होती तितकीच ती स्पष्टवक्ताही होती. मुलींमध्ये भांडण झाले, तर त्या स्वत:च ते सोडविण्यासाठी यायच्या. इतकच नाही तर शाळेत मुलेदेखील त्यांना वचकून असायची, असे जोगिंदर यांनी सांगितले.