Dry cloth in Delhi, sharp rise in the level of pollution
दिल्लीला धुरक्याची चादर, प्रदूषणाच्या पातळीत कमालीची वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 10:55 PM2017-10-20T22:55:21+5:302017-10-20T22:58:16+5:30Join usJoin usNext नवी दिल्लीत फटाके फोडल्यानं प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. प्रदूषणाची पातळी मोजणारे ऑनलाइन इंडिकेटर्स गुरुवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून हवेचा दर्जा खूप खराब झाल्याचे संकेत देत होते. दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि फरिदाबादमधील लोकांनी फटाके विक्रीवर बंदी असूनही इतर ठिकाणांहून फटाके आणून धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली. सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी एअर क्वालिटी इंडेक्स 319 होता. दिल्लीतील आनंद विहारमध्ये प्रदूषण सामान्य प्रदूषणापेक्षा 24 पटीने वाढलं. तर इंडिया गेटच्या परिसरातील प्रदूषण 15 पटीने वाढलेलं पाहायला मिळालं. टॅग्स :नवी दिल्लीप्रदूषणNew Delhipollution