कोलकात्यात दुर्गा पूजेसाठी सजले मंडप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:50 IST2017-09-25T14:46:27+5:302017-09-25T14:50:45+5:30

पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सव बंगालमध्ये दरवर्षी अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो.
बंगालमध्ये नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून सुरु होणारा हा सण दहाव्या दिवशी संपतो. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे मंडप घातले जातात.
दुर्गा देवीची पूजा पाहण्यासाठी तसंच एकापेक्षा एक देखावे पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
यंदा शहरात देवीच्या पुजेसाठी एकुण तीन हजार मंडप सजले आहेत. त्यापैकी एका मांडवात बाहुबली 2 सिनेमाचा देखावा साकारण्यात आला आहे.