आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचा सर्वात सोपा उपाय...जाणून घ्या By हेमंत बावकर | Published: November 2, 2020 04:24 PM 2020-11-02T16:24:38+5:30 2020-11-02T16:30:38+5:30
Aadhar Card linking to Bank: आरटीओमध्ये गाडी नावावर करायची असली तरीही एकमेव आधार कार्ड मागितले जात आहे. सध्या तर अनेक बँकांना केवायसीम्हणून आधार देण्याची सक्ती केली आहे. अन्यथा तुमचे खातेच गोठविले जात आहे. आधार कार्ड एक महत्वाचे कागदपत्र बनले आहे. आधार कार्ड आवश्यक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले असले तरीही सरकारी कामांपासून ते बँक खाते, सिमकार्ड खरेदीपर्यंत सगळीकडे आधारच विचारले जाते.
आरटीओमध्ये गाडी नावावर करायची असली तरीही एकमेव आधार कार्ड मागितले जात आहे. सध्या तर अनेक बँकांना केवायसीम्हणून आधार देण्याची सक्ती केली आहे. अन्यथा तुमचे खातेच गोठविले जात आहे. यामुळे आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यासाठी काही पर्याय आम्ही तुमच्या सोईसाठी घेऊन आलो आहोत.
सध्या काही बँकांमध्ये आधार लिंक करणे हा ऐच्छिक आहे. परंतू बँकेत गेल्यावर आधार कार्ड मागितले जाते. यामुळे हे लिंक केल्यास व्यवहार करणे काहीसे सोपे जाणार आहे. केवायसीच्या समस्येत पैशांविना तुमचे महत्वाचे काम अडून राहणार नाही.
नेट बँकिंगच्या माध्यमातून जर तुमच्या खात्याला नेट बँकिंगची सुविधा असेल तर काही स्टेप्समध्ये आधार लिंक करता येणार आहे. यासाठी नेट बँकिंग लॉगईन करावे लागेल. यानंतर आधार नंबर टाकून पुढे आलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. यानंतर व्हेरिफाय झाले की तुमची आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण होईल.
एटीएमद्वारे तुम्ही बँक एटीएमद्वारेही अकाऊंटला आधार लिंक करू शकता. ही सुविधा फक्त डेबिट कार्डवरच उपलब्ध आहे. हे डेबिट कार्ड तुमच्या बँक खात्याचे असायला हवे.
बँक शाखेत जाऊन बँक शाखेत जाऊन तुम्ही आधार कार्ड खात्याला लिंक करू शकता. येथे तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे. यामध्ये नाव, वय आणि जन्म तारीख, रजिस्टर मोबाईल नंबर, बँक अकाऊंट नंबर आणि आधार नंबरची माहिती द्यावी लागेल.
बँक तुमच्या माहितीची पडताळणी करून त्यानंतर तुमचे आधार कार्ड अकाऊंटला लिंक करणार आहे.
मोबाईल अॅप मोबाईल अॅपद्वारे बँकेच्या मोबाईल अॅपवरून तुम्ही बँक अकाऊंट लिंक करू शकता. सध्या प्रत्येक बँकेचे अॅप उपलब्ध आहे.
सर्वात महत्वाचे आधार लिंक झाले हे कसे पहाल? स्टेप 1. यूआयडीएआयच्या वेबसाइटवर www.uidai.gov.in जावे लागेल.
स्टेप 2. यानंतर 'Check Aadhaar/Bank Linking Status' वर क्लिक करावे.
स्टेप 3. आता स्क्रीनवर एक पेज ओपन होईल. ज्यावर 12 आकडी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
स्टेप 4. आता तुम्हाला 'सेंड ओटीपी' वर क्लिक करावे लागेल. हा ओटीपी 10 मिनिटांसाठी वैध असेल.
स्टेप 5. रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून सबमिट क्लिक करावे. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर लिंकिंग स्टेटस दिसणार आहे.