eight important and controversial points on which india china face off fight sna
केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 07:40 PM2020-05-28T19:40:25+5:302020-05-28T20:04:00+5:30Join usJoin usNext भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद जवळपास सहा दशकांपासूनचा आहे. हा वाद मिटवण्यासाठी भारताने अनेक वेळा पुढाकार घेतला. मात्र, चीनने कधीही असा प्रयत्न केला नाही. चीन नेहमीच कधी लडाख, कधी अक्साई चिन, कधी तिबेट तर कधी डोकलाम आणि सिक्कममध्ये सीमांचे उल्लंघण करत असतो. चीन आणि भारत यांच्यात नेहमीच घुसखोरीवरून वाद होत असतात. कारण दोघेही सीमांकडे आपापल्या दृष्टीने पाहतात. दोन्ही देशांमध्ये आजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेल्या अनेक भागांत निश्चित सीमारेशाच स्पष्ट झालेली नाही. यामुळेच दोन्ही देशांमध्ये अनेकदा तणाव उद्भवतो. चला, तर जाणून घेऊया 'ते' 8 महत्वाचे मुद्दे, ज्यांमुळे भारत आणि चीन यांच्यात सातत्याने सुरू असतो वाद. अरुणाचल प्रदेशवर दावा - संपूर्ण अरुणाचलवर दावा करत तो आमचाच आहे, असे चीन म्हणतो. अरुणाचल प्रदेशात एका जल विद्युत प्रकल्पासाठी आशिया डेव्हलपमेन्ट बँकेकडून लोन घेण्यासंदर्भात चीनने जोरदार विरोध केला होता. अरुणाचलला विवादास्पद सांगण्यासाठी चीन तेथील नागरिकांना एक विशेष प्रकारचा व्हिसा देतो. अनेकदा तर अरुणाचल सीमेवरही चीन आणि भारतीय जवानांत वाद होतात. ब्रह्मपुत्रा नदीवरून वाद - ब्रह्मपुत्र नदीसंदर्भात चीनची भूमिका ठीक नाही. तो या नदीवर धरणांची कामे करत आहे. ब्रम्हपुत्रेचे पाणी पाटाच्या माध्यमाने उत्तर चीन भागात नेण्याची त्याची इच्छा आहे. यावरून भविष्यात मोठा वाद होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन भारताने हा मुद्दा अनेकदा द्विपक्षीय बैठकीतही उचलला आहे. हिंदी महासागरातीलि चीनच्या हलचाली - चीन गेल्या काही वर्षांत हिंदी महासागरातील आपल्या हालचाली वाढवत आहे. पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि मालदीवसह भागिदारी प्रकल्प सुरू करून भारताला घेरण्याचा त्याचा डाव आहे. तिबेटची तक्रार - भारत आणि चीन यांच्यातील तिबेट, राजकीय आणि भौगोलिकदृष्ट्या मध्यस्त म्हणून काम करत होता. चीनने 1951मध्ये तिबेटवर कब्जा केला. भारताने तिबेटला आधिच मान्यता दिलेली आहे. मात्र, तिबेटीयन शरणार्थींच्या मुद्द्यावर चीन अनेकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न करतो. अक्साई चीन रस्त्यासह इत सीमांवर रस्ते - लडाख भागात अक्साई चीन रस्ता आणि अशा अनेक भागांत चीन रस्त्याची कामे करत आहे. हेदेखील वादाचे एक कारण आहे. चीन जम्मू-काश्मीरलाही भारताचा भाग मानण्यास तयार होत नाही. मात्र, POKला पाकिस्तानचा भाग मानतो. हादेखील वादाचा एक मुद्दा आहे. 3,488 किलोमीटरच्या सीमेवर वाद - भारत आणि चीन यांच्यात जवळपास 3,488 किमी लांबीची सीमा आहे. मात्र, अद्यापही सीमाप्रश्न सुटलेला नाही. सीमाप्रश्न सुटावा यासाठी चीन जाणून बुजून प्रयत्न करत नाही. तो या सीमावादाचा भारतावर दबाव आणण्यासाठी वापर करतो. सीमा वादावरून भारत आणि चीन सैन्यात अनेकदा भांडण झाल्याचेही बघायला मिळते. पीओकेरमध्ये सुरू असलेले चीनचे काम - पीओके आणि गिलगित बालटिस्तानरमध्येही चीन हालचाली करत आहे. धरण बांधत आहे. रस्ते बांधत आहे. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनीही म्हटले होते, की या भागात तीन ते चार हजार चीनी लोक कार्यरत आहेत. यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवानही आहेत. साउथ चीन समुद्र ते दक्षिण आशियामध्येही अशांतता - देशाला आवश्यक असलेल्या उर्जेसाठी चीन, दक्षिण चीन समुद्रातात आपले वर्चस्व निर्माण करू इच्छितो. त्याला येथे व्हिएतनाम, जपान आणि फिलिपाईन्सकडून आव्हान मिळत आहे. काही वर्षांपूर्वी चीनने व्हिएतनामच्या दोन तेल ब्लॉक प्रकल्पात सहभागी असलेल्या भारतीय कंपन्यांनाही धमकावले होते. त्यांनी दक्षीण चीन समुद्रापासून दूर राहावे, असे चीन म्हणाला होता. येथे चीनच्या सातत्याने काही ना काही हालचाली सुरूच असतात.टॅग्स :सीमा वादभारतभारतीय जवानचीनलडाखborder disputeIndiaIndian Armychinaladakh