Election officials conduct election for only one voter
केवळ एका मतदारासाठी निवडणूक अधिकारी करतात दिवसभर पायपीट By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 03:56 PM2019-03-26T15:56:59+5:302019-03-26T16:13:23+5:30Join usJoin usNext भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार हा सर्वात महत्त्वपूर्ण अधिकार मानला जातो. त्यामुळे प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. त्यामुूळे मतदार कितीही असले, मतदान केंद्र दुर्गम भागात असले तरी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्राची व्यवस्था केली जाते. असेच एक मतदान केंद्र ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. येथे केवळ एका मतदारासाठी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अरुणाचल प्रदेशमधील अनजॉ जिल्ह्यात भारत आणि चीनच्या सीमारेषेवर हे मतदान केंद्र असून येथे केवळ एका महिला मतदाराकडून मतदानाचा हक्क बजावला जातो. या मतदारासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्राची व्यवस्था केली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी दिवसभर पायपीट करून तिथे पोहोचतात. तसेच या एकमेव मतदारासाठी दिवसभर वाट पाहतात. अनजॉ जिल्ह्यातील मालोगम गावात ही एकमेव महिला मतदार वास्तव्यास असून तिचे नाव सोकेला तयांग असे तिचे नाव आहे. तिच्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्राची व्यवस्था केली जाते. खरंतर सोकेला ही येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहते. तसेच इतरही काही कुटुंबे इथे वास्तव्यास आहेत. मात्र त्यातील मतदारांची नावे अन्य मतदान केंद्रात नोंद झालेली आहेत. पूर्वी या केंद्रावर या महिलेच्या पतीचेही नाव नोंदवलेले होते. मात्र आता त्यांचेही नाव अन्य मतदान केंद्रात वर्ग झाले आहे. टॅग्स :लोकसभा निवडणूकअरुणाचल प्रदेशनिवडणूकLok Sabha Election 2019Arunachal PradeshElection