election workers in india travelled over 4 days to set up a polling booth for one voter
‘त्या’ एका मतदारासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी केला 4 दिवसांचा प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 07:56 PM2019-04-19T19:56:45+5:302019-04-19T19:58:52+5:30Join usJoin usNext लोकसभा निवडणूक 2019 च्या निवडणुकीमध्ये असे काही फोटो व्हायरल होतायेत ज्याने आपल्या देशाची लोकशाही किती मजबूत आहे हे सिद्ध होतं. लोकशाहीत प्रत्येक मतदाराच्या मताला किंमत असते. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी फक्त एका मतदारासाठी इतक्या दूर जात मतदान केंद्र बनवलं निवडणूक अधिकाऱ्यांनी अरूणाचल प्रदेशच्या मालोगम येथे एका मतदारासाठी 4 दिवसांचा प्रवास करत 483 किमी अंतर पार केलं. मतदान केंद्र बनविण्यासाठी कठिण डोंगराळ भागातून वाट काढत तिथे पोहचावं लागलं. उत्तर पूर्व भारताच्या एका कोपऱ्यात मतदान केंद्र बनविण्यासाठी गैमर बैम आणि त्यांच्या सहकारी टीमला अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्याठिकाणी 42 वर्षीय सोकेला तयांग नावाच्या एकुलत्या एक मतदान वास्तव्य करतात. त्या शेतीचा व्यवसाय करतात. नियमांनुसार कोणत्याही मतदाराला मत देण्यासाठी 1.24 किमीपेक्षा अधिकचा प्रवास करायला लागू नये यासाठी ठिकठिकाणच्या अंतरावर मतदान केंद्र बनवली जातात. या मतदान केंद्रावर 11 एप्रिल रोजी मतदान होतं. 2011 च्या जनगणनेनुसार याठिकाणी 5 मतदार राहण्यास होते. मात्र 2019 पर्यंत केवळ 1 मतदार याठिकाणी शिल्लक राहिलाटॅग्स :मतदानभारतीय निवडणूक आयोगVotingElection Commission of India