EVM Reached By Helicopter In World's Hightest Polling Booth Tashigang
हेलिकॉप्टरद्वारे जगातील सर्वात उंच मतदानकेंद्री पोहचल्या EVM By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 02:45 PM2019-05-17T14:45:00+5:302019-05-17T14:52:36+5:30Join usJoin usNext हिमाचल प्रदेशातील सर्वात उंचीवर असलेल्या मतदान केंद्र ताशिगंग येथे निवडणूक आयोगाने हेलिकॉप्टरने ईव्हीएम मशिन पाठवल्या आहेत. लाहौल स्पीति खोऱ्यामध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे ताशिगंग येथील 30 मतदान केंद्रावर या मशिन पोहचविण्यात आल्या आहेत. गुरुवारी लाहौलच्या स्मींगरी हेलिपॅडवरुन भारतीय वायू सेनेच्या दोन हेलिकॉप्टरने या मशिन स्पीतिच्या काजा येथे पोहचण्यात आल्या. याठिकाणी 19 मे रोजी मतदान होणार आहे. ताशिगंगमधील तापमान शुन्यापेक्षा कमी झालं आहे. काही दिवसांपूर्वी येथील 32 किमी रोडवरील बर्फ हटविण्याचं काम केलं गेलं. ताशिगंगमध्ये एकूण 49 मतदारांपैकी 29 पुरुष आणि 20 महिला मतदार आहेत. मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. भारत-चीन सीमेपासून सुमारे 29 किमी अंतरावर असलेल्या मतदान केंद्रामध्ये ताशिगंग गावाचा समावेश होतो.