कोरोनाच्या सावटात जागतिक योग दिन, सोशल डिस्टन्स जपून घरातचं योगासनं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:24 PM2020-06-21T12:24:23+5:302020-06-21T12:50:38+5:30

कोविड-१९ साथीमुळे रविवारी सार्वजनिक गर्दी टाळून डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला. २१ जून २0१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला, तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिन आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर झाला.

‘योगा अ‍ॅट होम, योगा विथ फॅमिली’(घरच्या घरी योग, परिवारासोबत योग), असे यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य आहे. आज रोजी सकाळी ७ वा. लोक या आभासी समारंभात आपापल्या घरूनच सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

विदेशातील भारतीय दूतावासांकडून लोकांना डिजिटल माध्यमातून योग दिन उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यासाठी योग संस्थांची मदत घेतली. यंदाच्या योगदिनी लेह येथे मोठा कार्यक्रम घेण्याची तयारी आयुष मंत्रालयाने केली होती. तथापि, साथीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ११ डिसेंबर २0१४ रोजी घेतला होता.

राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही सोशल डिस्टन्स पाळून योगसाधना करत योग दिन साजरा केला

आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश मुख्य आकर्षण राहणार आहे. कोविड-१९ साथीमुळे यंदा सार्वजनिक कार्यक्रमाला महत्त्व न देता लोकांकडून संपूर्ण कुटुंबासह आपापल्या घरूनच योग करून घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारनेही योग दिन साजरा करत योगासने केली

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या निवासस्थानी योगासने करत योग दिन साजरा केला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशविसायांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच, योगासनेच महत्त्व पटवून देत कोरोनाच्या लढाईवर मात करण्यासाठी योगसने महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

माजी मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही घरातच राहून योग दिनाचे सेलिब्रेशन केले, त्यानंतर आपल्या ट्विटर अकांटवरुनन फोटोही शेअर केले आहेत

योग दिन हा विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा दिवस असल्याचे मोदींनी म्हटले. त्यासोबतच, आपल्या सृदृढ आयुष्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगता कोरोनावर मात करण्यासाठी योगासने करण्याचेही मोदींनी सूचवले.

कोरोना आपल्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो, पण प्राणायम केल्याने ही यंत्रणा मजबूत होते. प्राणायम करण्याचे अनेक प्रकार असून अनुलोम-विलोम, भ्रामरी इत्यादी प्रकार आहेत.

प्राणायम केल्याने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते, असेही मोदींनी म्हटले. योगोच्या सहाय्यानेच कोरोनावर मात करण्यास मदत मिळत आहे. योगामुळे मानिसक तणाव दूर होऊन शांतीसह संयम आणि सहनशक्ती मिळेल, असेही मोदींनी म्हटले.

आपल्याकडे, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु। युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दु:खहा।। असं म्हणतात. म्हणजेच, कामकाज, जेवण, झोप, खेळ आणि सर्वकाही योग्यरितीने करायला हवे.