Experience the natural beauty of this state of India!
भारतातल्या या राज्यातील निसर्ग सौंदर्य नक्कीच अनुभवा ! By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 07:36 PM2017-10-09T19:36:09+5:302017-10-09T19:42:09+5:30Join usJoin usNext दार्जिलिंगमधली जगविख्यात टॉय ट्रेनची सफर जबरदस्त रोमांचकारी असते. निसर्गाच्या कुशीतून जाणारी टॉय ट्रेन पर्यटकांना आकर्षित करते. दार्जिलिंगमधल्या निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी वर्षाच्या 12 महिने इथे पर्यटकांची गर्दी असते. दार्जिलिंगमध्ये गेल्यास टायगर हिलला भेट दिल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. पहाटेच्या क्षणीचा सूर्योदय पाहणं हा अद्भुत अनुभव असतो. पहाटेच्या 4 ते 6 वाजेदरम्यान इथं गेल्यास तुम्हाला भास्कराचं नयनरम्य दृश्य पाहायला मिळू शकतं. चहाच्या मळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगला निसर्गानं भरभरून दिलं आहे. दार्जिलिंगमध्ये तुम्ही ट्रेकिंगची मज्जाही लुटू शकता. तसेच दार्जिलिंगमध्ये फेरफटका मारल्यास तुम्हाला जागोजागी चहाचे मळे तुमच्या नजरेस पडतील. टॅग्स :निसर्गNature