Fact Check : खरच, सर्व महिलांना मिळणार 60000 रुपये?; जाणून घ्या - व्हायरल बातमीमागील सत्य

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 8, 2020 06:15 PM2020-12-08T18:15:04+5:302020-12-08T18:24:53+5:30

सध्या काही लोक चांगल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्या ऐवजी फेक बातम्या पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. अशा प्रकारची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. हे प्रकरण केंद्र सरकारच्या एका योजनेशी संबंधित आहे.

एका यूट्यूब व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे, की केंद्र सरकार 'महिला शक्ती योजने'अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 60,000 रुपये जमा करत आहे.

यूट्यूबवरील हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होऊ लागला आहे.

सरकार खरोखरच महिलांच्या बँक खात्यात 60 हजार रुपये टाकत असेल, तर आपल्यालाही ही सरकारी मदत मिळावी, असे प्रत्येकाला वाटने सहाजिकच आहे.

कोरोना काळात केंद्र सरकारने विविध प्रकारची आर्थिक मदत महिलाच्या जनधन खात्यात पोहोचवली आहे.

लॉकडाउन काळात पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत महिलांच्या जनधन खात्यात एप्रिलपासून जूनपर्यंत अर्थात सलग तीन महिने 500 रुपये जमा करण्यात आले आहेत.

यूट्यूबवर टाकण्यात आलेल्या या फेक व्हिडिओमुळे देशभरातील लोकांची दिशाभूल होत आहे. कारण हा व्हिडिओ केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठीच टाकण्यात आला होता.

पीआयबी फॅक्ट चेकच्या (PIBFactcheck) पडताळणीत महिलांच्या बँक खात्यात 60,000 रुपये टाकले जाणार असल्याचे सांगण्यात आलेला हा व्हिडिओ फेक असल्याचे समोर आले आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने, व्हिडिओमध्ये करण्यात येत असलेला दावा फेक असल्याचे म्हटले आहे. कारण केंद्र सरकारकडून महिला शक्ती सारखी कुठलीही योजना चालवली जात नाही. म्हणजे, यूट्यूबवरील व्हिडिओमध्ये 60,000 रुपयांसंदर्भात करण्यात येत असलेला दावा फेक असल्याचे सिद्ध झाले आहे.