वडील-आजोबांच्या नावावर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2000 रुपयांचा हप्ता By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 09:52 PM 2020-08-19T21:52:53+5:30 2020-08-19T22:31:37+5:30
किसान सन्मान निधी योजना गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. मात्र या योजनेचा लाभ 1 डिसेंबर 2018 पासून शेतकऱ्यांना मिळत आहे. आतापर्यंत 6 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
जेव्हापासून ही योजना लागू झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र सरकार 100% निधी पुरवते आणि त्याअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जाते. या योजनेतील प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला एका हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात.
मोदी सरकारचे म्हणणे आहे की, किसान सन्मान निधीने शेतकर्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजा भागविण्यास आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक मदत करण्यास मदत केली आहे.
पंतप्रधान-किसान योजनेंतर्गत पैसे थेट ‘आधार’शी जोडल्या गेलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातात.
या योजनेंतर्गत 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांना वर्षाकाठी 6,000 रुपये दराने मदत केली जात आहे.
केवळ 2 हेक्टर किंवा त्याहून कमी जमीन असणारे शेतकरीच या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याअंतर्गत ग्रामीण व शहरी भागाच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना पुढील 5 वर्षांपर्यंत 6000 रुपये देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी शेतकर्याच्या नावे शेती असणे आवश्यक आहे. जर शेती योग्य जमीन शेतकऱ्याच्या नावावर नसेल तर त्याला लाभ मिळणार नाही.
एवढेच नव्हे तर जमीन आजोबांच्या किंवा शेतकर्याच्या वडिलांच्या नावावर असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
याशिवाय, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या नावावर शेती जमीन असल्यास. मात्र, आपण सरकारी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त असल्यास आपण या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम राहणार नाही. यासह कोणाकडे शेतीसाठी जमीन असल्यास आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळाल्यास अशा लोकांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
या व्यतिरिक्त नोंदणीकृत डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाऊंटेंट, आर्किटेक्ट आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
दुसरीकडे, जर शेतकरी नोंदणीकृत शेती असलेल्या जागेवर काही इतर कामे करीत असेल तर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही.
या योजनेचा लाभ घेणारे शेतकरी किसान सन्मान निधी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांचा असा विश्वास आहे की, ही योजना कर्जमाफी योजनेपेक्षा चांगली आहे आणि ते याचा वापर बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा खत खरेदीसाठी करू शकतात.