Fast ahead of Indian Railways before bullet train
बुलेट ट्रेनच्या आधीच भारतीय रेल्वे होणार वेगवान By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 03:49 PM2018-03-22T15:49:47+5:302018-03-22T15:49:47+5:30Join usJoin usNext भारतीय रेल्वे दिवसेंदिवस कात टाकत असून, आता आणखी वेगवान होणार आहे. एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लवकरच दुप्पट हॉर्सपॉवरच्या ताकदीचं इंजिन बसवण्यात येणार आहे. बिहारच्या मधेपुरात भारतातली पहिलं 12,000 हॉर्सपॉवर ताकदीचं इलेक्ट्रिक इंजिन बनवण्यात येत आहे. या इंजिनानं भारतीय रेल्वेची ताकद दुपटीनं वाढणार आहे. प्रोटोटाइप लोकोमोटिव्ह अंतर्गत गेल्या वर्षी मेमध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. तसेच जुलै 2018मध्ये ही दुप्पट हॉर्सपॉवर असलेली इलेक्ट्रॉनिक इंजिनं ट्रेनमध्ये बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वे आणखी वेगवान होणार आहे. टॅग्स :भारतीय रेल्वेIndian Railway