हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी, हिमस्खलन आणि भूस्खलनाची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 15:31 IST2020-01-16T15:29:11+5:302020-01-16T15:31:56+5:30

हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी होत असल्यानं वातावरण बिघडलेलं आहे. दोन दिवस सूर्य दिसल्यानंतरही वातावरणात सुधारणा झालेली नाही.

. शिमल्यातही हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागानं पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

तसेच हिमस्खलनाचीही सूचना दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्यानं हिमस्खलन आणि भू-स्खलन यांसारख्या घटना होण्याची भीती वाढली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून हिमाचल प्रदेशमधलं वातावरण ढगाळ आहे.

त्यामुळे हिमस्खलन आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. लाहोलच्या हिमस्खलनानं एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला आहे.

जिल्हा प्रशासन वारंवार लोकांना सावधानीनं प्रवास करण्याच्या सूचना करत आहेत.