film will be made on seema sachin over story name will be karachi to noida
सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर बनणार चित्रपट; नाव असेल 'कराची ते नोएडा' By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 04:32 PM2023-08-08T16:32:35+5:302023-08-08T16:39:47+5:30Join usJoin usNext पाकिस्तानातून पळून आलेल्या सीमा हैदरची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पाकिस्तानातून पळून आलेल्या सीमा हैदरची सर्वत्र चर्चा रंगली आहे. भारतातील सचिन मीणासोबतची तिची प्रेमकहाणी इतकी प्रसिद्ध झाली आहे की, सर्वांनाच या कपलची ओळख होऊ लागली आहे. आता या दोघांवर एक चित्रपटही बनणार आहे. जानी फायरफॉक्स प्रॉडक्शन हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक अमित जानी हा चित्रपट बनवणार आहेत. कराची ते नोएडा असं या चित्रपटाचं नाव असेल. मिळालेल्या माहितीनुसार, अमित जानी पुढील आठवड्यात कराची ते नोएडा या चित्रपटाचे थीम साँग लाँच करणार आहेत. अमित यांनी याआधी सीमाला आणखी एका चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी सीमा तयारही झाली आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लालच्या हत्येवर बनलेल्या त्या चित्रपटाचे नाव आहे 'ए टेलर मर्डर स्टोरी'. चित्रपटात सीमा हैदर रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. गेल्या आठवड्यात जानी फायरफॉक्स प्रोडक्शन हाऊसच्या टीमने ग्रेटर नोएडा गाठून सीमा हैदरची भेट घेतली. टीमने सीमाची ऑडिशनही घेतली. सीमा खूप खूश दिसत होती. चित्रपटात काम करण्यास उत्सुक असलेली सीमा हैदर म्हणाली की, मला चित्रपटात काम करायचे आहे. ती फक्त यूपी एटीएसकडून क्लीन चिटची वाट पाहत आहेत. दुसरीकडे अमित जानी यांनाही धमक्या मिळू लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे माजी प्रवक्ते अभिषेक सोम आणि मोनू मानेसर यांनी आपल्याला धमक्या दिल्याचा आरोप अमित जानी यांनी केला आहे. अभिषेकने व्हिडिओद्वारे धमकी दिली आहे की तो त्यांच्या गुंडांसह चित्रपटाच्या सेटवर हल्ला करेल. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चित्रपट दिग्दर्शक अमित जानी यांनी ट्विटद्वारे यूपी पोलिसांच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. पाकिस्तानची रहिवासी सीमा हैदर मोबाईलवर PUBG खेळताना भारताच्या सचिनच्या प्रेमात पडली होती. यानंतर ती बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून प्रियकराला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात आली. मात्र त्याला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. सचिनला न्यायालयात हजर करण्यात , त्यानंतर त्याची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आता यूपी एटीएस सीआलेमा हैदर प्रकरणाचा तपास करत आहे. सीमा आणि सचिन सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. टॅग्स :भारतपाकिस्तानIndiaPakistan