Covaxin घेतली असेल तर चिंता सोडा; भारत बायोटेककडून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 11:53 AM2021-07-03T11:53:55+5:302021-07-03T11:59:33+5:30

Covaxin third testing result declared: स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन (Covaxin Vaccine) च्या तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच अंतिम टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. याचसोबत कंपनीने या चाचणीचे निकालही जाहीर केले आहेत.

स्वदेशी कंपनी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन (Covaxin Vaccine) च्या तिसऱ्या टप्प्यातील म्हणजेच अंतिम टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहेत. याचसोबत कंपनीने या चाचणीचे निकालही जाहीर केले आहेत. (Bharat Biotech concludes final analysis for Covaxin efficacy as part of phase 3 clinical trials, after evaluation of 130 confirmed cases.)

यामध्ये ही कोरोना लस गंभीर रुग्ण आणि डेल्टा व्हेरिअंटची लागणा झालेल्या रुग्णांवर परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे. (Covaxin's efficacy demonstrated at 77.8% against symptomatic COVID19 patients)

भारत बायोटेकने तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारीच्या आधारे सांगितले की, कोव्हॅक्सिन सरासरी ७७.८ टक्के प्रभावी आहे.

जगभरात दहशत फैलावणाऱ्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात देखील ही लस 65.2% टक्के परिणामकारक आढळली आहे.

कोरोनाचे गंभीर संक्रमण झालेल्यांना वाचविण्यात कोव्हॅक्सिन 93.4% प्रभावी ठरली आहे.

कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर ही कोव्हॅक्सिन लस 63.6% प्रभावी ठरली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांवरून असे आढळले आहे की, ही लस सरासरी 77.8% परिणामकारक आढळली आहे.

कोव्हॅक्सिन ६० वर्षांवरील नागरिकांसाठी 67.8% आणि ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी 79.4% प्रभावी ठरली आहे. या टप्प्यातील लस घेणाऱ्या ९९ नागरिकांमध्ये गंभीर साइड इफ़ेक्ट्स दिसून आले.

Asymptomatic केस: 63% प्रभावी, डेल्टा व्हेरिएंट: 65% प्रभावी, कमी-मध्यम आणि गंभीर लागण झालेल्यांवर 78% प्रभावी.

कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील परिणाम हा 130 कोरोना रुग्णांवर चाचण्या घेऊन जाहीर केला आहे.