finger 4 and 8 near pangong lake cause of India-China 'face to face'
पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स' म्हणजे नेमकं आहे तरी काय? ज्यांच्यामुळे भारत-चीन आले 'आमने-सामने' By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 12:44 AM2020-06-05T00:44:11+5:302020-06-05T10:14:17+5:30Join usJoin usNext भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातारण आहे. यावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र, थोडीही उणीव सोडण्याची भारताची इच्छा नाही. यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत तयार आहे. अशातच चर्चा सुरू आहे, फिंगर 4 आणि फिंगर 8ची. पण, हे फिंगर्स म्हणजे नेमके आहे तरी काय? चला, तर जाणून घेऊया... गेल्या काही वर्षांपासून चिनी सैन्य पेंगाँग सरोवराच्या किनाऱ्यावर रस्त्यांचे काम करत आहे. 1999मध्ये कारगिल युद्ध सुरू असताना चीनने संधीचा फायदा घेत भारताच्या सीमेत सरोवाच्या काठावर 5 किलोमीटर लंबीचा रस्ता तयार केला होता. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर काही पहाड आहेत. यांना स्थानिक भाषेत छांग छेनमो असेही म्हटले जाते. या टेकड्यांच्या उचलल्या गेलेल्या भागालाच लष्कर 'फिंगर्स', असे संबोधते. भारताचा दावा आहे, की एलएसीची सीमा फिंगर 8 पर्यंत आहे. मात्र ते फिंगर 4 पर्यंतच नियंत्रण ठेवतात. फिंगर 8वर चीनचे पोस्ट आहे. तर, फिंगर 2 पर्यंत एलएसी असल्याचे चिनी सैन्याचे म्हणणे आहे. सहा वर्षांपूर्वी चिनी सैनिकांनी फिंगर 4वर कायमचे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताने विरोध केल्यानंतर ते पाडण्यात आले. फिंगर 2वर गस्त घालण्यासाठी चिनी सैन्य हलक्या वाहनांचा वापर करते. गस्तीच्या वेळी भारताच्या गस्ती पथकाशी त्यांचा आमना-सामना झाला तर त्यांना परत जाण्यास सांगण्यात येते. कारण दोन्ही देशांच्या पेट्रोलिंग गाड्या त्या ठिकाणी फिरवता येत नाहीत. यामुळे गाडीला परतावे लागते. भारतीय जवान तेथे पायीदेखील गस्त घालतात. आत्ताचा तणाव पाहता, येथील गस्त वाढवण्यात आली आहे. मे महिन्यात भारत आणि चीनच्या सैन्यांत फिंगर 5 जवळ वाद झाला होता. चीनी सेनिकांनी भारतीय जवानांना फिंगर 2च्या पुढे जाण्यापासून रोखले होते. बोलले जाते, की की 5,000 चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात तळ ठोकला आहे. सर्वाधिक समस्या उत्पन्न होते पेंगाँग सरोवराजवळ. कारण येथेच दोन्ही देशांच्या सैन्यात वाद झाला आहे. एलएसी तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. पहिला भाग अरुणाचल प्रदेशपासून सिक्किमपर्यंत, दुसरा हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा भाग, तर तिसरा भाग आहे लडाख. भारत, चीनला लागून असलेल्या जवळपास 3,488 किलोमीटरवर आपला दावा सांगतो. तर चीनचे म्हणणे आहे, की हे सर्व 2000 किलो मीटरपर्यंतच आहे. एलएसी म्हणजे दोन्ही देशांमधील एक अशी रेषा, जी दोन्ही देशांना वेगळं करते. दोन्ही देशांचे जवान एलएसीवर आपापल्या भागांत गस्त घालत असतात. येथील पेंगाँग सरोवराजवळच 6 मेरोजी भारत आणि चीनच्या सैन्यात भांडण झाले होते. सोरोवराचा 45 किलोमीटर एवढा पश्चिमेकडील भाग भारताच्या नियंत्रणात येतो. तर उरलेला चीनच्या ताब्यात आहे. पूर्व लडाख एलएसीच्या पश्चिम सेक्टरमध्ये बांधकाम करते, जे काराकोरमजवळून लडाखपर्यंत येते. याच भागात देशाची सर्वात उंच एअरफील्ड दौलत बेग ओल्डी आहे. आता काराकोरम सडकेच्या मार्गाने दौलत बेग ओल्डीला जोडला गेला आहे. दक्षिणेकडे चुमार आहे, हा भाग पूर्णपणे हिमाचल प्रदेशला जोडला गेला आहे. पेंगाँग सरोवर, पूर्व लडाखमध्ये 826 किलो मीटरच्या अगदी केंद्राजवळ आहे. 19 ऑगस्ट 2017 रोजीदेखील पेंगाँग सरोवराजवळच दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. पेंगाँग याचा लडाखी भाषेत अर्थ होतो अत्यंत जवळचा संपर्क आणि त्सो एक तिबेटियन शब्द आहे. याचा अर्थ होतो सरोवर. हे सरोवर हिमालयात आहे. हे सरोवर 14,000 फुटांपेक्षाही अधिक उंचीवर आहे. हे सरोवर लेहपासून दक्षिण पूर्वेकडे जवळपास 54 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. 135 किलोमीटर लांब असलेले हे सरोवर जवळपास 604 स्क्वेअर किलोमीटरपेक्षाही अधिक भूभागावर पसरलेले आहे. पेंगाँग याचा लडाखी भाषेत अर्थ होतो अत्यंत जवळचा संपर्क आणि त्सो एक तिबेटियन शब्द आहे. याचा अर्थ होतो सरोवर. हे सरोवर हिमालयात आहे. हे सरोवर 14,000 फुटांपेक्षाही अधिक उंचीवर आहे. हे सरोवर लेहपासून दक्षिण पूर्वेकडे जवळपास 54 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. 135 किलोमीटर लांब असलेले हे सरोवर जवळपास 604 स्क्वेअर किलोमीटरपेक्षाही अधिक भूभागावर पसरलेले आहे. हे सरोरव थंडीच्या दिवसात पूर्णपणे गोठून जाते. असे म्हटले जाते, की 19व्या शतकात डोग्रा साम्राज्याचे जनरल जोरावर सिंह यांनी आपले सैनिक आणि घोड्यांना गोठलेल्या या सरोवरावर प्रशिक्षण दिले होते. यानंतर ते तिबेटमध्ये दाखल झाले होते. रणनीतीच्या दृष्टीने या सरोवराचे फारसे महत्व नाही. मात्र, हे चुशुलच्या मार्गावर आहे आणि हा रस्ता चीनमध्ये जातो. कुठल्याही आक्रमणाच्या वेळी चीन याच रस्त्याच्या मदतीने भारताच्या सीमेवर दाखल होतो. 1962मध्ये झालेल्या युद्धाच्या वेळीही चीनने याच रस्त्याची मदत घेतली होती. त्यावेळी भारताने रेजांग ला पासवर शौर्याने चीनला प्रत्युत्तर दिले होते. चुशुलमध्ये तेव्हा 13कुमायूं बटालियन तैनात होती. तिचे नेतृत्व मेजर शैतान सिंह करत होते.टॅग्स :सीमा वादसीमारेषाचीनभारतलडाखसैनिकborder disputeBorderchinaIndialadakhSoldier