The first human trial of corona vaccine begins in India
कोरोना लसीची पहिली मानवी ट्रायल सुरू, 2 दिवसात 8 जणांना दिला डोस By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 10:11 PM2020-07-16T22:11:34+5:302020-07-16T22:19:40+5:30Join usJoin usNext देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. देशात सध्याच्या घडीला दर दिवशी ३० हजारांहून जास्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे. Covid19india.org या संकेतस्थळानुसार, देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या रोगोावर लस कधी येणार, याचीच चिंता सर्वांना लागली आहे. या सर्व नागरिकांसाठी खुशखबरी आहे. बिहारच्या पाटना येथील एम्स रुग्णालयात कोविड 19 लसीची चाचणी घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे मानवी जीवावर याची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. येथील एम्स रुग्णालयात गेल्या 2 दिवसांत 8 जणांना या लसीची चाचणी देण्यात आली आहे. एम्सचे प्रबंधक प्रभातकुमार सिंह यांनी संदर्भात माहिती दिली. पहिल्या टप्प्यात सुरुवातीला 18 जणांना या लसीचा डोस देण्यात आला असून त्याचा अहवाल तब्बल तीन महिन्यांनी येणार आहे. या लसीची ट्रायल चाचणी 54 जणांवर करण्यात येणार आहे, असेही सिंह यांनी म्हटले कोरोनाच्या लसीची देशातील ही पहिलीच मानव ट्रायल आहे, पाटणा एम्समधून याची सुरुवात झाली आहे. हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने या लसीची निर्मित्तीक केली असून पाटणा एम्ससह देशातील 12 वैद्यकीय संस्थामध्ये ही मानव ट्रायल होणार आहे दरम्यान, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर गेलं आहे. बहुतांश कोरोना रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून येतात.टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्याबिहारहॉस्पिटलcorona virusCoronaVirus Positive NewsBiharhospital