ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध दुसरी कसोटीही चार गडी राखून जिंकली आहे. कांगारूंनी भारताचा चार गडी राखून पराभव करत मालिकेमध्ये वरचश्मा राखला आहे.मराठा व मुस्लीम आरक्षणाला स्थगिती देण्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवत महाराष्ट्र सरकारला धक्का दिला आहे.भाजपाचे पाठिराखे रामजादे व विरोधक हरामजादे असं बेलगाम वक्तव्य करणा-या भाजपाच्या खासदार साध्वी निरंजन ज्योती यांनी अखेर माफी मागितली.मरीन ड्राइव्हच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे १९०० कोटी रुपयांचे भव्य स्मारक उभारण्यास पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.२७ वर्षांच्या प्रवासी महिलेवर उबेर कंपनीच्या ड्रायव्हरने दिल्लीत बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ. बलात्कारी ड्रायव्हर शिवकुमार यादववर याआधीही बलात्काराचा आरोप असून त्याला पोलीसांनी अटक केली.धर्मांतराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट द्यायला हवं अशी आग्रही मागणी करत विरोधकांनी राज्यसभेचे कामकाज होऊ दिले नाही.आग्रा येथे धर्म जागरण मंचाने २०० गरीब मुस्लीमांना घरवापसी कार्यक्रमांतर्गत हिंदू धर्मात आणल्याच्या घटनेने खळबळ. हे धर्मांतर स्वेच्छेने झाले की जबरदस्तीने व लालूच दाखवून यावरून पेटले रणकंदनISIS चे समर्थन करणारे व इराक व सीरियातल्या घडामोडींची माहिती देणारे @shamiwtness या ट्विटरहँडलचा यूजर मेहदी मसरूर बिस्वास याला बेंगळूर पोलीसांनी अटक केली. इंग्लंडच्या चॅनेल ४ ने मेहदी बेंगळूरमधून हे ट्विटर हँडल चालवत असल्याची बातमी ब्रेक केली होती.सिडनीतील एका कॅफेमधल्या सुमारे ४० जणांना बंदुकीच्या धाकावर हारून मोनीस या माथेफिरूने ओलीस ठेवले आणि ISISच्या विचारसरणीचा धोका जगभर पसरल्याचे दिसून आले. कॅफेमध्ये ISISचा फ्लॅग मागवण्याची व पंतप्रधानांशी बोलण्याची मागणी करणा-या मोनिसला ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. दोन नागरिकांना या घटनेत प्राण गमवावे लागले.पाकिस्तानमधील पेशावर येथील एका लष्करी शाळेवर पाकिस्तान तालिबानच्या ६ दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात १३२ निष्पाप विद्यार्थी ठार झाले. दहशतवाद्यांचे आत्तापर्यंतच्या या सगळ्यात नृशंस व भ्याड हल्ल्यामुळे जग हादरले.भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) यांना "भारतरत्न" पुरस्कार जाहीर झाला.२८ डिसेंबर रोजी एअर एशियाचे इंडोनेशियाहून सिंगापूरला जाणारे क्यूझेड ८५०१ हे विमान जावा बेटाजवळील समुद्रात कोसळले. या विमानात १५५ प्रवासी आणि ७ कर्मचारी असे १६२ जण होते. यापैकी ४६ जणांचे मृतदेह सापडले असून अजूनही शोधमोहीम सुरु आहे.भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३० डिसेंबररोजी तडकाफडकी कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया दौ-यात कसोटी मालिका गमावल्यावर धोनीने हा निर्णय घेतला असून आता तो फक्त वन डे व टी- २० सामन्यांमध्येच खेळणार आहे.