follow rules while using coins in india coinage act
असे आहेत चलनातील नाण्यांसाठीचे नियम By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:36 PM2019-02-05T17:36:03+5:302019-02-05T18:08:25+5:30Join usJoin usNext दैनंदिन व्यवहारात नाण्यांचा वापर केला जातो. एक रुपयांपासून 10 रूपयांपर्यंतची नाणी चलनात वापरली जातात. याआधी 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे आणि 50 पैशाची नाणी होती. मात्र काही काळानंतर ती चलनातून बाद करण्यात आली आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाण्यांविषयी अनेक नियम आहेत. यातील काही नियम तोडल्यास तुरूंगवासही भोगावा लागू शकतो. नाण्यांसंबंधी असलेले असेच काही नियम जाणून घेऊया. चलनात असणारे नाणे घेण्यास जर कोणी नकार दिला तर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करू शकतो. आरोपी व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल. रिझर्व्ह बँकेमध्येही याबाबत तक्रार करू शकता. आपण किती रुपयांपर्यंत नाणी देऊ शकतो याबाबतही नियम आहे. फक्त एक हजार रूपयांपर्यंतची नाणी आपण एकत्रित देऊ शकतो. जर त्यापेक्षा जास्त नाणी देऊन तुम्ही काही घेत असाल किंवा कोणाला देत असाल तर गुन्हा ठरू शकतो. नाण्यांना वितळून अन्य वस्तूची निर्मिती करणे चुकीचे आहे. असा प्रकार समोर आल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. 2011च्या नाणे अधिनियम 5 ए अनुसार, जर कोणी नाणे तोडले तर त्याला त्याच्या बाजारमुल्याएवढा दंड भरावा लागेल. नाणे अधिनियम 9 नुसार, जर तुम्हाला वाटत असेल समोरील व्यक्तीने बनावट नाणं दिले आहे. तर तुम्हाला त्या नाण्याला नष्ट करण्याचा अधिकार आहे. गरजेपेक्षा जास्त नाणी जवळ ठेवण्यास अनुमती नाही. तसेच नाण्यांना त्यांच्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीमध्ये विकणेही गुन्हा आहे.टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकReserve Bank of India