विवाहित असल्यास विसरभोळेपणा वाढतोय; पण आयुष्य वाढते, घटतो हृदयविकाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:31 IST2025-04-15T11:26:37+5:302025-04-15T11:31:56+5:30

अविवाहित असल्यास किंवा तुम्ही घटस्फोटित असाल तर तुम्हाला डिमेंशिया होण्याचा धोका कमी असतो. तुम्ही विवाहित असाल तर मात्र डिमेंशियाचा धोका वाढतो.

अविवाहित असल्यास किंवा तुम्ही घटस्फोटित असाल तर तुम्हाला डिमेंशिया होण्याचा धोका कमी असतो. तुम्ही विवाहित असाल तर मात्र डिमेंशियाचा धोका वाढतो. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या एका नवीन अभ्यासातून हे आश्चर्यकारक तथ्य समोर आले आहे.

२०१९ मध्ये अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की ‘संशोधन कालावधीत सहभागी झालेल्या लोकांना अविवाहित लोकांपेक्षा विवाहित लोकांना डिमेंशिया होण्याची शक्यता जास्त होती.” खरं तर, विवाहित लोकांचे आरोग्य सामान्यतः चांगले मानले जाते.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की त्यांना हृदयरोग आणि हृदयविकाराचा धोका कमी असतो आणि ते जास्त काळ जगतात. तर नवीन अभ्यास या आश्चर्यकारक निष्कर्षापर्यंत का पोहोचला? हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

अभ्यासाच्या सुरुवातीला ज्यांना डिमेंशिया नव्हता अशा २४,००० हून अधिक अमेरिकन लोकांचे संशोधकांनी विश्लेषण केले. सहभागींच्या आरोग्याचे १८ वर्षे निरीक्षण करण्यात आले.

टीमने विवाहित, घटस्फोटित, विधवा आणि अविवाहित अशा चार गटांमधील डिमेंशियाच्या दरांची तुलना केली. संशोधनात असे दिसून आले की इतर तीन गटांमध्ये विवाहित गटापेक्षा डिमेंशियाचा धोका कमी होता.

संशोधकांना असेही आढळून आले की ज्या लोकांचा घटस्फोट झाला आहे किंवा ज्यांनी अविवाहितांमध्ये या डिमेंशिया होण्याची शक्यता कमी असते. ज्यांच्या जोडीदाराचा अभ्यासादरम्यान मृत्यू झाला त्यांनाही धोका कमी असतो.

याचे एक कारण म्हणजे विवाहित लोक लक्षणे नोंदवण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांच्या जोडीदारांना स्मरणशक्तीच्या समस्या लगेच लक्षात येतात. यामुळे विवाहित लोकांमध्ये डिमेंशियाची नोंद अधिक होऊ शकते.