मंगळयानाची चार वर्षे! इस्रोने प्रसिद्ध केली लालग्रहाची अप्रतिम छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 15:36 IST2018-10-01T15:32:21+5:302018-10-01T15:36:02+5:30

भारताची मंगळावरील पहिली अंतराळ मोहीम असलेल्या मंगळयानाला मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचून चार वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने इस्रोने मंगळयानाने टिपलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
मंगळयानाने या लालग्रहाची आतापर्यंत 980 छायाचित्रे टिपली आहेत.
मंगळ ग्रहाचे दोन उपग्रह असलेल्या फोबोस आणि डीमोस यांची छायाचित्रेही मंगळयानाने टिपली आहेत.
मंगळयानाने विविध कोनांमधून मंगळ ग्रहाच्या टिपलेल्या छायाचित्रांमुळे मंगळाबाबतच्या अधिक संशोधनास चालना मिळणार आहे.
नोव्हेंबर 2013 रोजी भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले होते.
24 सप्टेंबर 2015 रोजी मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला होता.