Sonali Phogat: मॉडेलिंग, अँकरिंग, टिकटॉक स्टार ते भाजपा नेत्या, कोण होत्या सोनाली फोगाट, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:25 PM 2022-08-23T13:25:53+5:30 2022-08-23T13:29:44+5:30
Sonali Phogat Death: भाजपाच्या हरयाणामधील नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. सोनाली फोगाट यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग आणि अँकरिंग पासून केली होती. नंतर त्या टिकटॉकवरही प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पक्षात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं बिग बॉस १४ मध्येही त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. भाजपाच्या हरयाणामधील नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. सोनाली फोगाट यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंग आणि अँकरिंग पासून केली होती. नंतर त्या टिकटॉकवरही प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पक्षात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं बिग बॉस १४ मध्येही त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.
सोनाली फोगाट यांनी २०१९ मध्ये हरयाणा विधानसभा निवडणुकीत आदमपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र तिला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.
सोनाली फोगाट यांचे सोशल मीडियावर काही फोटो प्रसिद्ध झाले होते. ते फोटो मॉडेलिंगच्या दिवसातील आहेत. सोनाली यांनी २००६ मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात हिसार दूरदर्शनमध्ये अँकर म्हणून केली होती.
अँकरिंगसोबत सोनाली मॉडेलिंगसुद्धा करायची. त्यानंतर दोन वर्षांनी २००८ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
सोनाली फोगाट यांचा विवाह त्यांच्या बहिणीचा दीर संजय यांच्याशी झाला होता. संजय यांचा २०१६ मध्ये हरयाणातील फार्म हाऊसमध्ये संशयास्पद परिस्थिती मृत्यू झाला होता.
सोनाली यांना एक मुलगी आहे. तिचं नाव यशोधरा फोगाट आहे. ती मुंबईत राहून शिक्षण घेत होती.
बिग बॉस १४ मध्ये सोनाली फोगाट अभिनेता अली गोनीसोबतच्या नात्यावरून चर्चेत होत्या.
दरम्यान, याच शोमध्ये त्यांनी राहुल वैद्यशी बोलताना पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या जीवनात एक व्यक्ती आली होती, असं गुपित उघड केलं होते. मात्र हे नातं काही कारणांमुळे पुढे जाऊ शकलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
२०१९ च्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत सोनाली फोगाट यांनी मातब्बर नेते कुलदीप बिश्नोई यांना आव्हान दिले होते. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र राजकीय वर्तुळात त्यांची खूप चर्चा झाली होती.