गणपती बाप्पा मोरया...देशातील सार्वजनिक गणेशोत्सव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:23 PM2019-09-03T17:23:24+5:302019-09-03T17:34:27+5:30

लाडक्या बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. देशात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे.

कोयंबत्तूरमधील पुलियाकुम गणपतीची 20 फूट उंचीची मूर्ती.

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती.

चेन्नईत भारतीय लष्कराच्या वेशात गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे.

मुंबईच्या गणेशोत्सवात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला गणपती म्हणजे गौड सारस्वत ब्राम्हण सेवा मंडळ म्हणजेच ‘जीएसबी गणपती’. अलंकारांनी सजलेली भव्य बाप्पांची मूर्ती.

हैदराबामध्ये सूर्य देवाच्या रुपात गणपतीची मूर्ती साकारण्यात आला आहे.

कर्नाटकात 9,000 नारळांचा वापर करुन गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे.

चेन्नईतील कोलाथूर येथे कोरफड पानांचा वापर करून साकारण्यात आलेली गणपती मूर्ती.

मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी लालबागच्या राजाच्या पाठीमागे 'चांद्रयान-2'चा देखावा साकारण्यात आला आहे.

आंध्रप्रदेशातील नंदीगामा येथील उसापासून गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे.

ओडिसातील पुरी येथील समुद्र किनाऱ्यावर वाळू आणि 1000 प्लॉस्टिकच्या बॉटल्स वापरुन गणेशाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

चेन्नईतील पूमपुकार नगरमध्ये रुद्राक्षापासून गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली आहे.