Gas leak from Visakhapatnam refreshes wounds in Bhopal 36 years ago MMG
विशाखापट्टणमच्या गॅस गळतीने ३६ वर्षांपूर्वीच्या भोपाळमधील जखमा ताज्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 02:59 PM2020-05-07T14:59:49+5:302020-05-07T15:11:42+5:30Join usJoin usNext एकीकडे देश कोरोना विषाणूच्या संकटात सापडला असतानाच आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण पसरले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच हजारो नागरिक आजारी पडले आहे. विशाखापट्टणममध्ये झालेल्या या गॅस गळतीसाठी नेमका कुठला विषारी वायू कारणीभूत ठरला. या कंपनीमध्ये नेमके बनते काय? आणि तिथे या गॅसचा वापर कशासाठी होतो. असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. विशाखापट्टणममधील विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून जो विषारी वायू लिक झाला आहे त्याचं नाव स्टीरीन आहे. या वायूला एथनीलबेन्झीन असेही म्हणतात. हे एक सिंथेटिक केमिकल आहे. हे केमिकल रंगहीन द्रव्याच्या रूपात असते. मात्र, बराच वेळ हा गॅस ठेवला तर तो हलक्या पिवळ्या रंगाचा दिसतो. स्टीरीन हा अत्यंत ज्वालाग्राही असतो. त्यामुळे त्याचे ज्वलन होते तेव्हा मोठ्या प्रमाणात विषारी वायूचे उत्सर्जन होते. होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे माजी संचालक डॉक्टर डी. रघुनाथ राव यांनी सांगितले की, स्टीरीन गॅसचा वापर मुख्यत्वेकरून पॉलिस्टिरीन प्लॅस्टिक बनवण्यासाठी केला जातो. विशाखापट्टणमच्या गॅस गळतीने ३६ वर्षांपूर्वी भोपाळमध्ये झालेल्या गॅस दुर्घनेतील जखमा ताज्या झाल्या आहेत. २ डिसेंबर १९८४ साली झालेल्या या गॅस दुर्घटनेचा जगातील सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटनांच्या यादीत झाला आहे. भोपाळच्या युनियन कार्बाईड फॅक्टरीतून विषारी वायू गळती झाली होती. या गॅस गळीतीच विपरीत परिणाम आजही तेथील काही लोकांवर दिसून येतो. विशाखापट्टण येथील गॅस गळतीच्या तुलनेत भोपाळमधील युनियन कार्बाईड कंपनीतील गॅस गळती अतिश भीषण आणि मोठी दुर्घटना होती. पण, तरीही विशाखापट्टण येथील घटनेने त्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत. भोपाळीमधील गॅस दुर्घटनेत जवळपास ३००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर १.०२ लाख लोकांच्या जीवनावर या दुर्घटनेचा विपरीत परिणाम झाला होता. अनेकांनी अपंगत्व आणि श्वसनाचे रोग या गळतीमुळे सुरु आले आहे. भोपाळच्या दुर्घटनेत मृत्युचा खरा आकडा १५ हजारांपेक्षा जास्त होता. पण, सरकारी रेकॉर्डनुसार ३७८७ लोकांच्याच मृत्युची नोंद झाली होती. विशाखापट्टणम येथील गॅस गळीतीनंतर ट्विटरवर विशाखापट्टण ट्रेंड करत आहे. देशातील दिग्गज खेळाडूंनी आणि दक्षिण भारतील सेलिब्रिटींनी या दुर्घनेबाबत शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागातील संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांची बैठक घेऊन याबाबत चर्चा केली आहे. टॅग्स :आंध्र प्रदेशभोपाळमृत्यूAndhra Pradeshbhopal-pcDeath