Get well Soon Sir, Netizens pray for nitin Gadkari on Twitter after corona
Get well Soon Sir, ट्विटरवरुन गडकरींसाठी नेटीझन्सची प्रार्थना By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 10:27 PM2020-09-16T22:27:09+5:302020-09-16T22:33:53+5:30Join usJoin usNext केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कोरोनाची लागण झाली आहे. गडकरींनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि प्रोटोकॉलचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलं आहे. गडकरी सध्या विलगीकरणात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याआधी गृहमंत्री अमित शहांसह केंद्रातल्या अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माझी प्रकृती आता चांगली आहे. तुमचे आशीर्वाद आणि सदिच्छा माझ्यासोबत आहेत. मी सध्या विलगीकरणात आहे,' असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नितीन गडकरी हे देशातील मोठे नेते आहेत, तसेच सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळेच, गडकरींच्या कोरोनाची बातमी समजताच ट्विटर ट्रेंड करत आहे. Get well soon sir, असा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला असून नेटीझन्सकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. गडकरी हे केंद्रीय दळणवळण मंत्री असून स्पष्ट आणि कामाला कणखर नेता, म्हणून त्यांची देशात ओळख आहे. रस्ते बांधणीचे मोठे प्रकल्प त्यांच्या मार्गदर्शनात चालतात. आपल्या कामाच्या आणि स्वभावाच्या जोरावर गडकरींनी सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. त्यामुळेच, गडकरींनी लवकरात लवकर कोरोनाला मात देऊन, देशाच्या सेवेत हजर राहण्यासाठी चाहत्यांकडून ट्विटरवरुन प्रार्थना व ट्रेंड सुरू आहे. Get well soon Sir.... chase the coronaटॅग्स :नितीन गडकरीकोरोना वायरस बातम्यादिल्लीट्विटरNitin Gadkaricorona virusdelhiTwitter