कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 04:43 PM 2024-10-10T16:43:17+5:30 2024-10-10T17:06:57+5:30
आशना चौधरी यांनी आपल्या जीवनात अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना केला, पण आपलं स्वप्न कधीही सोडलं नाही. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. आशना चौधरी यांनी आपल्या जीवनात अनेक आव्हाने आणि अडथळ्यांचा सामना केला, पण आपलं स्वप्न कधीही सोडलं नाही.
आशना एक IPS अधिकारी आहेत, त्यांनी २०२२ मध्ये ११६ व्या रँकसह UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. सलग दोनदा अपयशी ठरल्यानंतर त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश संपादन केलं. त्याचा प्रवास अनेकांना प्रेरणा देतो.
आशना चौधरी या उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील पिलखुआ या गावच्या रहिवासी आहे. त्यांचे वडील डॉ. अजित चौधरी हे सरकारी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर त्याची आई इंदू सिंह गृहिणी आहेत.
आशना यांना शिक्षण आणि सामाजिक कार्यात नेहमीच रस आहे. त्यांनी अभ्यासात चांगली कामगिरी केली आणि बारावीमध्ये ९६.५ टक्के गुण मिळवले. नंतर इंग्रजी साहित्यात पदवी संपादन केली.
साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमधून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर्सही केले. आशना यांनी त्यांच्या अभ्यासादरम्यान, एका एनजीओमध्ये देखील काम केलं जे गरजू मुलांना शिक्षित करण्यात मदत करतं.
आशना चौधरी यांनी २०१९ मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. कुटुंबातील सदस्यांकडून प्रेरणा मिळाली, वर्षभराच्या तयारीनंतर २०२० मध्ये पहिला प्रयत्न केला. मात्र, त्या प्रीलिम्स परीक्षा पास करू शकल्या नाहीत, जी यूपीएससी परीक्षेचा पहिला टप्पा आहे.
आशना निराश झाल्या पण हार मानली नाही. २०२१ मध्ये आणखी एक प्रयत्न करण्याचं ठरवलं. मात्र पुन्हा त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. अवघ्या अडीच गुणांनी त्यांची संधी हुकली.
आपल्या चुका लक्षात घेतल्या आणि त्यानुसार पुढच्या तयारीची रणनीती सुधारली. यानंतर त्यांनी २०२२ मध्ये हुशारीने प्रयत्न केले. अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. प्रीलिम्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळालं.
खूप आनंदी होत्या, पण समाधानी नव्हत्या. यूपीएससी परीक्षेचे पुढील टप्पे अधिक आव्हानात्मक आहेत हे त्यांना माहीत होतं. आशना यांनी UPSC परीक्षेच्या सर्व टप्प्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्या अधिकारी झाल्या.
IPS अधिकारी आशना चौधरी या फारस सुंदर दिसतात. सोशल मीडियावर त्या खूप एक्टिव्ह असून त्यांचे असंख्य चाहते आहेत.