Go 'तेजस' गोsss : मुंबई-अहमदाबाद एक्सप्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 20:27 IST2020-01-16T20:15:38+5:302020-01-16T20:27:23+5:30

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेसचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. तुम्हालाही रेल्वेगाडीतील हे इनसाईड फोटो पाहायला नक्कीच आवडेल
शुक्रवारी सकाळी 9 वाजता मुंबईतून तेजस एक्सप्रेसचं उद्घाटन होणार आहे. आयआरटीसीकडून दुसरी खासगी रेल्वे म्हणून मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस सुरू होत आहे.
केंद्र सरकारच्या योजनेनुसार 150 रेल्वे खासगी पद्धतीने चालविण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिली तेजस एक्सप्रेस दिल्ली-लखनौ या मार्गावर सुरू झाली होती.
अतिशय आरामदायक अन् वातानुकुलित ही तेजस एक्सप्रेस विमानसेवेचा आनंद देणारी असल्याचं फोटोवरुन दिसून येतंय.