सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ; चांदीच्या किंमतीत किंचिंत घट, जाणून घ्या, आजचा दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 02:58 PM2022-02-08T14:58:08+5:302022-02-08T15:06:52+5:30

सोन्याचा दर आज किलोमागे एक हजार रुपयांनी वाढला आहे. भारतात २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम सोन्याचा दर ४५,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,२५० रुपये आहे.

५ फेब्रुवारी २०२२ पासून सोन्याचा दर स्थिर होता.

दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,३०० रुपये आहे, जो राष्ट्रीय दरापेक्षा किंचित जास्त आहे.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.