Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण; चांदीचे भावही झाले कमी, जाणून घ्या आजचे दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 01:28 PM2021-07-28T13:28:08+5:302021-07-28T17:49:24+5:30

Gold Price Today: मंगळवारी 24 कॅरेट सोन्यासाठी 47 हजार 724 रूपये ग्राहकांना मोजावे लागले. 

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे अस्थिर आहेत. सोन्याच्या दरामध्ये कधी वाढ तर कधी घट नोंदवण्यात येत आहे. मंगळवारी देखील सोन्याचे घसरले होते. 2020 साली सोन्याच्या दराने तब्बल  56 हजार 2534 रूपयांचा आकडा गाठला.

यंदाच्या वर्षी सोन्याच्या दरात जवळपास 8 हजार 530 रूपयांची  घट नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी सोन्याचे दर प्रति ग्रॉम 225 रूपयांनी स्वस्त झाले. मंगळवारी 24 कॅरेट सोन्यासाठी 47 हजार 724 रूपये ग्राहकांना मोजावे लागले. 

इंडिया बुलियन एण्ड ज्वेलर्स एसोसिएशन द्वारा जारी केलेल्या ताज्या आकड्यांनुसार 23 कॅरेट सोन्याचे दर 47 हजार 533 रूपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 43 हजार 715 रूपये प्रति 10 ग्रॉम आहे.  इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स एसोसिएशन द्वारा जारी केलेल्या दरांमध्ये प्रत्येक शहरात 500 ते 1000 रूपयांचा फरक असणार आहे. 

दिल्लीत सोन्याचे दर 123 रूपयांनी तर चांदीचे दर 206 रूपयांना घसरले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजार मंगळवारी सोन्याचे दर 46 हजार 505 रूपये होते. मुंबईत देखील सोन्याचे दर दहा ग्रॅम 210 रुपयांनी घसरून 46,660 रुपयांवर पोहोचले आहेत.  गोल्ड रिटर्न वेबसाइटनुसार, चेन्नईमध्ये सोन्याचे  दर 10 ग्रॉम 45,040 रुपये आहे.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.