Gold prices fell; The price of silver also went down, know, today's exact price
Gold-Silver Rate: सुवर्णसंधी! सोन्याचे भाव घसरले; चांदीची किंमतही झाली कमी, जाणून घ्या, आजचा नेमका दर By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:50 PM2022-05-26T12:50:02+5:302022-05-26T12:57:10+5:30Join usJoin usNext गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,९८० रूपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत २७० रुपयांनी घसरण झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४७,६५० रुपये इतके आहे. तर १ किलो चांदीचा दर ६१,५०० रूपयांवर व्यवहार करत आहे. काल चांदीचा दर ६२,२०० रुपयांवर होता. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. टॅग्स :सोनंचांदीGoldSilver