Gold Rate Today: Gold prices fall again; Silver prices also stabilized, see today's rates!
Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण; चांदीचा दरही स्थिरावला, पाहा आजचे दर! By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 05:24 PM2021-08-08T17:24:08+5:302021-08-08T17:29:17+5:30Join usJoin usNext सोन्या चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत आहे. गेल्या 5 दिवसांपासून सोनं जवळपास 450 रुपयांनी स्वस्त झालं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर शुक्रवारी 6 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर 0.26 टक्क्यांपर्यंत घसरलं आहे. सोमवारी सोन्याचा दर 0.16 टक्क्यांनी घसरलं असून 10 ग्रॅम सोन्याचा दर 47926 रुपये आहे. MCX वर सोन्याच्या दरात पूर्ण आठवड्यात संथपणे पाहायला मिळत आहे. सोन्याचा दर घसरून 47500 रुपयांपर्यंत खाली जाऊन स्थिरावला आहे. जवळपास 400 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. यासोबतच चांदीच्या दरही स्थिरावला आहे. सोमवारी सोन्याचा दर 47926 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. या सोन्याच्या दरात 0.26 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे. त्यानुसार आता 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 47480 रुपये आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.टॅग्स :सोनंचांदीGoldSilver