Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आगामी काळात मात्र भाव वाढणार, जाणून घ्या आजचे दर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:01 PM2021-08-04T17:01:41+5:302021-08-04T17:09:37+5:30

Gold Rate Today: कोरोनाच्या काळात ऑगस्ट 2020 मध्ये सोने आपल्या सर्व उच्चांकी पातळीवर पोहोचले होते.

सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहे. बुधवारी म्हणजे 4 ऑगस्ट रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)च्या ऑक्टोबरमध्ये सोन्याच्या दरात 0.14 टक्के वाढ झाली आहे.

आज सोन्याचा दर 47,932 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा दर 0.32 टक्के वाढ झाली असून चांदीचा दर 68,132 रुपये प्रती किलोग्रॅम आहे.

सोमवार आणि मंगळवारी सलग दोन दिवस सोन्यात मंदीचा कल दिसून आला. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोने 31 रुपयांनी घसरून 46,891 वर बंद झाले. दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारातही 372 रुपयांची घसरण नोंदवली गेली. या घसरणीनंतर, त्याची बंद किंमत 66,072 रुपये प्रति किलो होती. यापूर्वी ट्रेडिंग सत्रात ते 66,444 रुपये प्रति किलो होते.

कोरोनाच्या काळात ऑगस्ट 2020 मध्ये सोने आपल्या सर्व उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. देशांतर्गत बाजारात, ते त्या पातळीपेक्षा सुमारे 9000 रुपये स्वस्त आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,'पुढील 3-5 वर्षात सोन्याचा दर सध्याच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. त्यांच्या मते, केंद्रीय बँका आणि जगभरातील सरकारने तरलतेसह प्रणालीला पूर दिला आहे. त्याचा परिणाम किती धोकादायक असू शकतो, यावर सध्या चर्चा होत नाही'.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.